शेलार पुढे म्हणाले की, आपण कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन कुकडीचे आवर्तन पिकांसाठी सोडण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना अगोदर सांगितले होते. त्यानुसार पाटील यांनी आमदार अतुल बेनके यांना पिंपळगाव जोगेचा लिप्टींग प्रश्न सोडवून पिंपळगाव जोगे धरणातील हेड स्टाॅकमधून पाणी काढून द्या, असे सांगितले. त्यानुसार दि. ९ एप्रिलला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ९ मे पासून कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. परंतु प्रशांत औटी यांच्या याचिकेमुळे कुकडी आवर्तनास स्थगिती मिळाली. दि. १२ ला सुनावणी ठेवली गेली. ही बाब न्यायप्रविष्ट झाल्याने आम्ही शांत राहण्याची भूमिका घेतली.
जयंत पाटील यांनी यावर तोडगा काढला होता. परंतु पुढे बबनराव पाचपुते यांनी कुकडी, घोड, सीना प्रकल्पातील रिक्त जागा भरण्याबाबत निवेदन दिले. याचवेळी ते आमदार रोहित पवार, आमदार बेनके यांना घेऊन जयंत पाटलांना भेटले. तिथेच गडबड झाली.
नंतर मी, राहुल जगताप, आण्णासाहेब शेलार, कैलास शेवाळे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्या. अनुराधा नागवडेंना उशिरा का होईना याचिका दाखल करण्याची बुध्दी दिली, पण पाचपुतेंनी तेही काम केले नाही.
कुकडी आवर्तनासाठी आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पवार यांच्या अभ्यासू भूमिकेमुळे डिंबे, माणिकडोह जोड बोगद्याच्या प्रलंबित प्रकल्पाचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.