शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पारनेर येथे घराच्या टेरेसवर बनवली रोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:42 IST

शासकीय रोपांवर अवलंबून न राहता स्वत:च्या घरावरच रोपवाटिका तयार करून शाळा, महाविद्यालयांना मोफत रोपे देण्याचा उपक्रम पारनेर येथील वृक्षमित्र व शिक्षक लतिफ राजे यांनी केला आहे.

पारनेर : स्वत: वृक्षप्रेमी असल्याने अनेक ठिकाणी वृक्षलागवड केलीच, पण केवळ शासकीय रोपांवर अवलंबून न राहता स्वत:च्या घरावरच रोपवाटिका तयार करून शाळा, महाविद्यालयांना मोफत रोपे देण्याचा उपक्रम पारनेर येथील वृक्षमित्र व शिक्षक लतिफ राजे यांनी केला आहे.पारनेर येथील लतिफ राजे हे ढवळपुरी येथील आश्रमशाळेत शिक्षक आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर तालुक्यात वृक्षसंवर्धनासाठी काम सुरू केले असून आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला झाडे लावून वाढदिवस साजरा करणे, यातून तेथे त्यांनी सुमारे तीनशे ते चारशे झाडांचे वृक्षारोपण केले आहे. झाडे जगविण्यासाठी विद्यार्थ्यांची वनबँक सुध्दा तयार केली आहे. आनंद मेडीकल फौडेशनचे सचिव डॉ. सादीक राजे यांच्या पुढाकाराने चाटे किडस् व राजीव गांधी विद्यालयात सुध्दा लतिफ यांनी सुमारे तीनशे झाडांचे वृक्षारोपण केले आहे. तालुक्यात वृक्षप्रेमी म्हणून कार्यरत असताना त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पर्यावरण विभागाचा राज्यस्तरीय सृष्टीमित्र पुरस्कार मिळाला़ त्यानंतर त्यांना आणखी बळ मिळाले. आपल्या घराच्या टेरेसवर रोपवाटिका बनविण्याचा निर्णय घेतला. या रोपवाटिकेतून तयार झालेली रोपे ते शाळा, सामाजिक संस्था यांना मोफत देतात.

एक हजार रोपांचे वाटप

लतिफ राजे यांचे घर पारनेर येथील राजे मशिदीजवळ आहे. घराच्या टेरेसवर रोपवाटिका करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांची पत्नी शबाना, मुले आफराज व आतीफ हे सुध्दा त्यांना मदत करीत आहेत. उन्हाने रोपे जळू नये म्हणून खाली प्लायवुड टाकण्यात आले आहे. त्यावरून माती टाकण्यात आली आहे. छत म्हणून नेट टाकण्यात आले आहे. दरवर्षी यासाठी तीन- चार हजार रुपये खर्च त्यांना येतो. या रोपवाटिकेत आंबा, जांभूळ, चिंच, आवळा यासह अनेक फळझाडे आहेत. मित्रांचा किंवा नातेवाईकांचा वाढदिवस असल्यास ते फळझाडे भेट देतात. तर शाळा, महाविद्यालयांना पिंपळ, वड, सुबाभूळ, लिंब व इतर झाडे देतात. रोपवाटिकेत गेल्यावर सुमारे तीनशे-चारशे झाडे तजेलदार असल्याचे दिसून आले. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण जसा वेळ मिळेल तसे रोपांना पाणी देत असल्याचे लतिफ राजे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर