शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रुमचे भाडे थकल्याने मालकाने सामान केले जप्त; कुटुंब रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 11:43 IST

भाडोत्री रूमचे तीन हजार रुपये भाडे थकले म्हणून मालकाने भाडेकरुचे सामान जप्त केले आहे. १६ मे रोजी राहुरी शहरात ही घटना घडली. या घटनेने भाडेकरुला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. यामुळे भाडेकरुने २३ मे रोजी पोलिसात धाव घेवून आपली कैफियत मांडली आहे.

 राहुरी : भाडोत्री रूमचे तीन हजार रुपये भाडे थकले म्हणून मालकाने भाडेकरुचे सामान जप्त केले आहे. १६ मे रोजी राहुरी शहरात ही घटना घडली. या घटनेने भाडेकरुला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. यामुळे भाडेकरुने २३ मे रोजी पोलिसात धाव घेवून आपली कैफियत मांडली आहे.बाबासाहेब बंडू निकम हे आपली पत्नी सुनीता व दोन छोट्या मुलांसह गेल्या एक वर्षापासून अण्णा कोरडे यांच्या मालकीच्या पंढरी मंगल कार्यालय शेजारी असलेल्या खोलीत दोन हजार रुपये महिना भाडे तत्वावर राहत होते. दरम्यान प्रत्येक महिन्याला बाबासाहेब निकम हे वेळेवर भाड्याची रक्कम अण्णा कोरडे यांच्याकडे देत होते. मात्र दोन महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे बाबासाहेब निकम व त्यांची पत्नी सुनीता यांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे दोन महिन्याचे चार हजार रुपये घरभाडे थकले आहे. त्यापैकी एक हजार रुपये बाबासाहेब निकम यांनी अण्णा कोरडे यांना दिले होते. फक्त तीन हजार रुपये भाडे देणे बाकी होते. मात्र अण्णा कोरडे यांनी घर भाड्यासाठी निकम कुटूंबीयांकडे तगादा लावला. थोडे दिवस थांबा तुमचे सगळे घरभाडे आम्ही देऊ. असे निकम कुटूंबीयांनी अण्णा कोरडे यांना सांगितले. मात्र  १६ मे रोजी बाबासाहेब निकम व त्यांची पत्नी सुनीता हे काही कामासाठी बाहेर गेले. यावेळी अण्णा कोरडे याने निकम राहत असलेल्या खोलीला बाहेरुन टाळे ठोकले. याबाबत निकम यांना अगोदर सगळे भाडे द्या. तेव्हाच तुमचे सामान देईल, अशी कठोर भूमिका अण्णा कोरडे यांनी घेतली. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बाबासाहेब बंडू निकम, त्यांची पत्नी सुनीता बाबासाहेब निकम व त्यांची दोन छोटी मुले यांच्यावर रस्त्यावर भटकण्याची वेळ आली आहे. सध्या रस्त्यावर बसून आपल्या छोट्या दोन मुलांना खाऊ-पिऊ घालण्याची वेळ बाबासाहेब निकम यांच्यावर आली आहे. पोलिसांकडे मागितला न्यायएकीकडे कोरोनामुळे रोजगार मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत राहुरी तालुक्यातील काही दानशूर व्यक्ती गरीब व गरजवंत कुटूंबांना शक्य होईल ती मदत करत आहे. तर एकीकडे केवळ तीन हजार रुपये घरभाडे थकले म्हणून निकम कुटूंबीयांचे घर सामान जप्त केल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब निकम यांच्या कुटूंबीयांना कोण व कसा न्याय देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मदतीसाठी निकम कुटूंबीयांनी २३ मे रोजी राहुरी पोलीस ठाणे गाठून न्याय मागितला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीRatanlal Plotरतनलाल प्लॉट