शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक भरतीत आयुक्तांची भूमिका संशयास्पद; शशिकांत चंगेडे यांची सचिवांकडे तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 10:39 IST

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भरतीतील फेरफार केलेल्या संशयास्पद उत्तरपत्रिका खासगी एजन्सीमार्फत तपासून तत्कालीन सहकार आयुक्त व नाशिकचे विभागीय सहनिबंधक यांनी न्यायालयीन आदेशाचा भंग केला आहे. त्यामुळे या अधिका-यांची चौकशी करुन तातडीने या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी सरकारी एजन्सीकडून करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी सहकार विभागाच्या सचिवांकडे केली आहे. 

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँक भरतीतील फेरफार केलेल्या संशयास्पद उत्तरपत्रिका खासगी एजन्सीमार्फत तपासून तत्कालीन सहकार आयुक्त व नाशिकचे विभागीय सहनिबंधक यांनी न्यायालयीन आदेशाचा भंग केला आहे. त्यामुळे या अधिका-यांची चौकशी करुन तातडीने या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी सरकारी एजन्सीकडून करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी सहकार विभागाच्या सचिवांकडे केली आहे. जिल्हा बँक भरतीतील अनियमितता ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर चंगेडे यांनी सहकार विभागाकडे या भरतीबाबत लेखी तक्रार केली होती.  चौकशी समितीच्या अहवालात त्यांच्या तक्रारीचा उल्लेख आहे. आता चंगेडे यांनी पुन्हा सहकार विभागाचे प्रधान सचिव व सहकार आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. या भरतीची न्यायालयीन आदेशानंतर जी फेरचौकशी करण्यात आली ती कायदेशीरपणे झालेली नाही, असे चंगेडे यांचे म्हणणे आहे.  या भरतीत अनेक उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेत परीक्षेनंतर फेरफार करुन त्यांना गुणवत्ता यादीत आणले आहे. त्यामुळे या संशयास्पद उत्तरपत्रिकांत शाईमध्ये तफावत दिसत आहे. या उत्तरपत्रिका फॉरेन्सिक तपासणी करणाºया सरकारी एजन्सीकडून तपासून घ्या असा आदेश राम कुलकर्णी समिती व न्यायालयाने दिला आहे.  मात्र, तत्कालीन सहकार आयुक्त व विभागीय सहनिबंधक यांनी जाणीवपूर्वक खासगी एजन्सीकडून ही तपासणी केली. ही दिशाभूल आहे. या अधिकाºयांचीच भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे या अधिकाºयांची चौकशी व्हावी, तसेच खासगी एजन्सीच्या अहवालाच्या आधारे भरती वैध ठरविणारा आदेश तत्काळ रद्द करावा, अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली आहे. ‘नायबर’ला काळ्या यादीत टाका जिल्हा बँकेने ‘नायबर’ या संस्थेला भरतीचे काम दिले होते. मात्र, ‘नायबर’ या संस्थेने परस्पर अन्य संस्थेकडे भरतीचे काम सोपविले. हा कराराचा भंग व बेकायदेशीर बाब आहे. यात ‘नाबार्ड’च्या आदेशाचाही भंग आहे. भरती रद्द होण्यासाठी एवढाच मुद्दा पुरेसा आहे. मात्र, ‘नायबर’ने परस्पर अन्य एजन्सी नियुक्त केल्याचे माहिती असूनही जिल्हा बँक, नाबार्ड, सहकार विभाग यापैकी कुणीच या संस्थेवर काहीच कारवाई केलेली नाही. याचा अर्थ काय ? त्यामुळे ‘नायबर’ संस्था तातडीने काळ्या यादीत टाकून त्यांच्या पदाधिकाºयांवर तसेच जिल्हा बँकेच्या संचालकांवरही कारवाई करावी तसेच सहकार विभागाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निदर्शनास हा मुद्दा आणला होता का? याचीही तपासणी करण्याची मागणी चंगेडेंनी केली आहे. या मुद्यांच्या चौकशीची केली मागणी जिल्हा बँकेने प्रथम श्रेणी अधिकारी पदावर सक्षम अनुभव नसलेल्या उमेदवाराला नियुक्ती दिली आहे. या उमेदवाराच्या अनुभवाची तपासणी करण्यात यावी. विशाल बहिरम या उमेदवाराला नियुक्तीपत्र मिळालेले नाही, अशी तक्रार आहे. बँकेने काही उमेदवारांना नियुक्तीपत्रेच पाठवली नसल्याचा संशय आहे. त्यामुळे गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादीतील जे उमेदवार हजर झालेले नाहीत त्यांना नियुक्तीपत्र मिळाले होते का? याची शासनानेच शहानिशा करावी, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांवर ठपका असताना त्यांना संचालक मंडळाने मुदतवाढ कशी दिली? याबाबतही चौकशी केली जावी, अशीही चंगेडे यांची मागणी आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्र