शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोचे बजेट ठरणार ‘कामा’वर

By admin | Updated: August 10, 2014 23:28 IST

अहमदनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे २०१५-१६ चे बजेट हे कामावर आधारित असणार आहे.

अहमदनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे २०१५-१६ चे बजेट हे कामावर आधारित असणार आहे. यात गेल्या वर्षी पूर्ण झालेल्या आणि चालू वर्षी मंजूर कामांची सरासरी विचारात घेण्यात येणार आहेत. यंदा रोहयोचे बजेट तयार करण्यासाठी प्रत्येक गावात ११ विशिष्ट घटकांचे घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात होणाऱ्या मागणीनुसार बजेट तयार करण्यात येणार आहे. हे १४ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविण्यात येते. यापूर्वी दरवर्षी १५ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामसभेत जिल्हाभर प्रत्येक ग्रामपंचायतीत रोहयोचा वर्षभराचा आराखडा तयार करण्यात येत असे. मात्र, यंदा शासनाने ही पध्दत बदलली आहे. यापुढे रोहयोचा आराखडा तयार करण्यापूर्वी प्रत्येक गावात ग्रामरोजगार सेवक यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्याच्या सूचना सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत. त्या सर्वेक्षणात होणाऱ्या कामांच्या आणि रोजगारांच्या मागणीवर आधारित बजेट तयार करण्यात येणार आहे.८ ते १४ आॅगस्ट हा सर्वेक्षणाचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे. या दरम्यान प्रत्येक गावात ११ प्रकारातील विशिष्ट प्रवर्गातील कुटुंबाची माहिती आणि जॉब कार्ड, कामांची मागणी याची नोंद घेण्यात येणार आहे. तसेच सन २०१३-१४ मध्ये झालेली कामे आणि २०१४-१५ मध्ये मंजूर कामांच्या आधारे २०१५-१६ चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामुळे यंदा पासून रोहयोचा आराखडा ग्रामसभेत ढोबळ मानाने तयार न करता, प्रत्यक्षात झालेली कामे, मंजूर कामे आणि मागणीवर आधारित राहणार आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे गावागावात ग्रामरोजगार सेवकांमार्फत सर्वेक्षण सुरू झाले आहे. येत्या १४ तारखेपर्यंत सर्वेक्षणावर आधारित मागणी संकलित होणार आहे. (प्रतिनिधी)