कर्जत : रयत शिक्षण संस्थेकडून शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची होणारी लूट, अवाजवी शुल्क आकारणे, डोनेशन घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे प्रकार रयत शिक्षण संस्थेने बंद करावेत, अशी मागणी काँगे्रस व रिपाइं नेत्यांनी केली आहे़रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात प्राचार्य गजानन चावरे यांना निवेदन देऊन चर्चा केली़ रयत शिक्षण संस्थेने या वर्षी विद्यार्थ्यांना वह्यांची सक्ती केली आहे़ या वह्या बाजारभावापेक्षा जास्त महाग पडतात़ या वह्यांना पाने कमी असून, त्यांचा दर्जाही नाही़ काही पालकांनी यापूर्वीच बाजारातून वह्यांची खरेदी केलेली आहे़ शिक्षकांनी याच वह्या खरेदी करण्याच्या सूचना दिल्यामुळे विद्यार्थीही पालकांकडे हट्ट धरीत आहेत़ त्यामुळे पालकांना नाहक आर्थिक भार सहन करावा लागत आहे़ तसेच शालेय प्रवेशासाठी डोनेशन व जास्त शुल्काची मागणी केली जात आहे़ याप्रकारातून पालकांची लूट होत असल्याची तक्रार काँगे्रसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके व रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे यांनी केली़ वह्यांची सक्ती करु नये, डोनेशन व जास्तीचे शुल्क आकारले जावू नये, स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी साळुंके, भैलुमे, युवक काँगे्रसचे तालुकाध्यक्ष दादा सोनमाळी यांनी मुख्याध्यापकांकडे केली़ (तालुका प्रतिनिधी)रयत शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांसाठी वह्या पाठविल्या आहेत़ त्या घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात आलेली नाही किंवा विकलेल्या नाहीत़- गजानन चावरे, मुख्याध्यापक
रयत संस्थेकडून विद्यार्थ्यांची लूट
By admin | Updated: June 24, 2014 00:04 IST