शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लूटमार करणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 15:17 IST

स्वस्तात किराणा माल व तेलाचे डबे देण्याचे आमिष दाखवून हॉटेलचालक व दुकानदारांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीतील तिघांना सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़

अहमदनगर : स्वस्तात किराणा माल व तेलाचे डबे देण्याचे आमिष दाखवून हॉटेलचालक व दुकानदारांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीतील तिघांना सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़मोहन नश्या भोसले (वय ३० रा़ शिरसगाव बोडखा ता़ श्रीगोंदा), विशाल सुरेश पवार (रा़ लोणी व्यंकनाथ) व निलेश हरिभाऊ पवार (रा़ निंबवी ) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत़ या तिघांसह त्यांचे साथीदार चलाश्या सीताराम भोसले, गोरख चलाश्या भोसले, खाल्या काळे असे मिळून लुटमार करतात़ या टोळीतील मोहन भोसले हा देशमुख पाटील या नावाने वावरतो़ मोहन याने मिरजगाव येथील दीपक कोंडीबा गोरे यांना स्वस्तात किराणा माल व तेलाचे डबे देतो असे आमिष दाखविले़ गोरे यांना ७ डिसेंबर रोजी सारोळा कासार (ता़ नगर) येथे निर्जन ठिकाणी बोलावून घेतले़ यावेळी तेथे लपून बसलेल्या इतरांनी गोरे यांच्यावर हल्ला करत त्यांच्याकडील १ लाख २० हजारांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत गोरे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती़या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना आरोपीविषयी माहिती मिळाली होती़ सहायक निरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, विजयकुमार वेठेकर, पोलीस नाईक भागीनाथ पंचमुखी, अण्णा पवार, रवींद्र कर्डिले, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, दीपक शिंदे, नवगिरे, भोपळे यांच्या पथकाने श्रीगोंदा परिसरातून या तिघा लुटारूंना अटक केली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस