शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणविरोधात सिद्धटेकमध्ये रास्तारोको : पुणे,दौंड,श्रीगोंदा,कर्जतकडील वाहतूक दोन तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:44 IST

कर्जत तालुक्यातील सिद्धटेकनजीकच्या वडार वस्ती येथील ग्रामस्थांनी विज महावितरणच्या कारभाराविरोधात दौंड-राशीन मार्गावर विजेच्या खांबावरील लोंबकळलेल्या धोकादायक वीजवाहक तारा व रोहित्राची तातडीने दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी महावितरणकडून सतत दुर्लक्ष होत असल्याने तापलेल्या ग्रामस्थांनी रास्तारोको करून आपल्या संतापाला वाट करून दिली.

राशीन : कर्जत तालुक्यातील सिद्धटेकनजीकच्या वडार वस्ती येथील ग्रामस्थांनी विज महावितरणच्या कारभाराविरोधात दौंड-राशीन मार्गावर विजेच्या खांबावरील लोंबकळलेल्या धोकादायक वीजवाहक तारा व रोहित्राची तातडीने दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी महावितरणकडून सतत दुर्लक्ष होत असल्याने तापलेल्या ग्रामस्थांनी रास्तारोको करून आपल्या संतापाला वाट करून दिली.महावितरणच्या राशीन येथील प्रभारी सहायक अभियंत्यांनी वीजवाहक तारा व रोहित्र दुरूस्तीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलकांनी यापूर्वी राशीन येथील महावितरणच्या कार्यालयात याबाबत निवेदन दिले होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने सकाळी ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. रास्तारोकोमुळे पुणे,दौंड,बारामती,श्रीगोंदा,कर्जतकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.वडार वस्तीवरील शेतीसाठी व घरगुती वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीच्या तारा धोकादायक पध्दतीने लोंबकळत आहेत. वादळी पावसामध्ये अनेक वेळा तारा तुटून पडण्याच्या घटना यापूर्वी घडल्या. तसेच प्राथमिक शाळेजवळून जाणाºया वीजवाहिनीही धोकादायक बनली आहे. यामुळे जीवित व वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे ग्रामस्थांनी महावितरणकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार करून काहीच दखल न घेतल्याने आंदोलन करण्यात आले. सिद्धटेक परिसरातील वीज वाहिनीच्या तारा कमजोर झाल्या आहेत. अनेक ठिकाणी विजेचे लोखंडी खांब कुजले आहेत. शेतामधील खांब ही अनेक ठिकाणी झुकलेले आहेत. त्यामुळे भविष्यात होणारा धोका टाळण्यासाठी धोकादायक खांब व वीजवाहिन्यांचे सर्वेक्षण करून त्यांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली.या मागण्यांचे निवेदन महावितरणच्या उपअभियंत्यांनी स्वीकारून जळालेले विद्युत रोहित्र व वीजवाहिनीच्या तारा आठ दिवसांमध्ये बदलून दिल्या जातील, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आश्वासनाप्रमाणे महावितरणने उपाययोजना न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपस्थितांनी दिला. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत