शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगाव देशमुख येथे निळवंडेच्या पाण्यासाठी रस्तारोको

By सचिन धर्मापुरीकर | Updated: November 17, 2023 15:46 IST

शुक्रवार उपोषणाचा दुसरा दिवस होता.

कोपरगाव (जि. अहमदनगर) : निळवंडेच्या पाण्याने पाझर तलाव भरून द्यावे या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे उपोषण सुरू आहे. उपोषणला पाठिंबा देण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. जो पर्यंत कोपरगाव तालुक्यातील पाझर तलावात पाणी सोडणे सुरू होत नाही तो पर्यंत, उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा ॲड. योगेश खालकर यांनी दिला. शुक्रवार उपोषणाचा दुसरा दिवस होता.

ॲड. योगेश खालकर, डॉ. अरूण गव्हाणे, गजानन मते, मनेगावचे सरपंच आण्णासाहेब गांगवे, कैलास रहाणे, संजय बर्डे आदी शेतकरी मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत उपोषणावर ठाम आहे. निळवंडेच्या दुसऱ्या चाचणीतून तळेगाव शाखेला पाणी सोडण्यात आले. एक टीएमएसी पाण्याची नासाडी करण्यात आली. जलसंपदा अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कोपरगाव तालुक्यातील एकाही पाझर तलावात पाणी आले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निळवंडेच्या चाचणीसाठी दीड टीएमएसी पाण्याची वाढीव उपलब्धता करून देण्यात आली आहे. मात्र अधिकाऱ्यांमुळे लाभक्षेत्र पाण्यापासून वंचित ठेवतील अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करण्यासाठी जलसंपदाचे उपकार्यकारी अभियंता महेश गायकवाड, तहसिलदार संदिपकुमार भोसले, शिर्डीचे पोलिस निरिक्षक संदिप शिरसाठ उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत उपकार्यकारी अभियंता व तहसिलदार यांनी तालुक्यातील सर्व पाझर तलावात पाणी सोडण्याच्या जागाची पाहणी केली. या पाहणीनंतर जलसंपदा अधिकारी यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी सुचविलेले पर्याय उपोषणकर्त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.रास्ता रोको आंदोलनावेळी शिवाजी शेंडगे, बाळासाहेब गोर्डे, धिरज देशमुख, अँड योगेश खालकर, अनिता खालकर, धनंजय वर्पे, गजानन मते, कैलास रहाणे, सुखलाल गांगवे आदींची भाषणे झाली.

आत्मदहनाचा इशाराउपोषणास पाठिंबा म्हणून शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. जनभावना तिव्र असतानाही प्रशासनाकडून योग्य ती कारवाई व ठोस आश्वासन न दिल्याने उपोषणकर्ते ॲड. योगेश खालकर यांनी शनिवारी (दि. १८) आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर