राहुरी तालुक्यातील जनतेची सर्व कामास सात्रळ ते तांभेरे रस्त्याने ये-जा केली जाते. कोल्हार येथे मनमाड-नगर प्रवरा नदीवरील पुलावर अडथळा आल्यास सर्व वाहतूक सात्रळ-तांभेरे मार्गे वळवली जाते. या रस्त्यावर मोठ्या वाहनांची भरपूर गर्दी होते.
सात्रळ ते तांभेरे अत्यंत वर्दळीचा असलेला रस्ता २१ फूट रुंदीचा करून, अतिक्रमण हटवून रस्ता पूर्ण करावा, अशी ग्रामस्थ कायम करतात. ऊस वाहतुकीच्या बैलगाड्यांची रहदारी असते. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.
या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन दिले. विखे पाटील कारखान्याचे विश्वासदादा कडू, बाबुराव पलघडमल, सात्रळचे सरपंच शाम माळी, सतीश ताठे, धानोरा सरपंच शाम माळी, सोनगावचे सरपंच अनिल अनाप, धानोराचे युवा नेतृत्व किरण दिघे, अमित दिघे, सुभाष चोरमुंगे, कारभारी डुकरे, हंबीर कडू, संतोष वाघ, संतोष साबळे, प्रभाकर साबळे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
-------०६ सात्रळ ---