शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमधील रास्तारोको सुरूच : आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम : पालकमंत्री फिरकलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 18:59 IST

कर्जत येथील दावल मालिक देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करणा-या तौसिफ हमीम शेख यांचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला.

कर्जतमधील रास्तारोको सुरूच : आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम : पालकमंत्री फिरकलेच नाहीतकर्जत : कर्जत येथील दावल मालिक देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करणा-या तौसिफ हमीम शेख यांचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांना कर्जतमध्ये सकाळी ११ वाजता सुरु केलेला रास्तारोको अजूनही सुरुच आहे.  शेख यांचा मृतदेह कर्जतमध्ये आणण्यात आला आहे. परंतु संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नसून पुर्णपणे अतिक्रमणे काढण्याच्या भुमिकेवर ते  ठाम आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना व अप्पर पोलीस अधीक्षक  मनीष कलवानिया दाखल झाले आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील घटना असूनही ते अद्याप कर्जतकडे फिरकलेच नाहीत. पालकमंत्री राम शिंदे यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा. शहीद तौसीफ शेख याला न्याय मिळावा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह पोलिस अधीक्षक आणि तालुका प्रशासन यांच्यावर 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. कुटुंबियासाठी १ कोटी रूपयांची मदत आणि नातेवाईकाला सरकारी नोकरी देण्यात यावी. दावल मलिक ट्रस्टच्या जागेतील अनाधिकृत सर्व अतिक्रमण तात्काळ काढावे. मागण्यांबाबत ठोस  कारवाई होइपर्यंत शहीद तौसीफ शेख यांचे दफन करण्यात येणार नाही, अशी एकमुखी मागणी रास्तारोको आंदोलनादरम्यान करण्यात आली असून अजूनही रास्ता-रोको आंदोलन सुरुच आहे. कर्जत शहरातील पीर दावल मलिक या देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अतिक्रमणे हटविली जावीत या मागणीसाठी तौसिफ हमीम शेख यांनी काल दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले होते. शेख हे ८० टक्के भाजल्याने त्यांना प्रथम नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र गुरुवारी मध्यरात्रीच प्रकृती गंभीर झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अद्यापही पालकमंत्री राम शिंदे फिरकलेच नाहीत..जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील ही घटना असूनही अद्यापपर्यत त्यांनी घटनास्थळी धाव घेतलेली नाही. सकाळपासून आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम असूनही प्रशासनानेही दखल घेतलेली नाही. 

अतिक्रमणे हटविली नावापुरतीच...सकाळी सुरु झालेल्या रास्तारोकोेनंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. ५० टक्के अतिक्रमणे प्रशासनाने हटविली. मात्र पक्की बांधकामे हटविण्यास प्रशासन धजावले नाही. हे अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनावर दबाव असल्याचे बोलले जात आहे. सर्व अतिक्रमणे जोपर्यत हटविण्यात येत नाहीत, तोपर्यत रास्तारोको सुरुच ठेवण्याच्या भुमिकेवर आंदोलक ठाम आहेत.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत