शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भंडारदरा-मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:36 IST

अकोले : आर्द्रा नक्षत्राच्या आषाढसरींची भुरभुर सोमवारी शहर परिसराने अनुभवली तर सायंकाळी भंडारदरा व मुळाधरण पाणलोटातील हरिश्चंद्रगड- रतनगड- घाटघर-कळसूबाई परिसरात हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला.

अकोले : आर्द्रा नक्षत्राच्या आषाढसरींची भुरभुर सोमवारी शहर परिसराने अनुभवली तर सायंकाळी भंडारदरा व मुळाधरण पाणलोटातील हरिश्चंद्रगड- रतनगड- घाटघर-कळसूबाई परिसरात हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला. दुबार पेरणीचे संकट सध्या टळले असले तरी शेतकºयांना आषाढाच्या जोरदार सरींची आस लागली आहे. भंडारदरा धरणात यंदा केवळ साडेसात टक्के नवे पाणी आले असून आजमितीस २६ टक्के जलसाठा आहे. 

यावर्षी २९ जून २०२०ला घाटघर येथे अवघा १६ तर पांजर येथे १५ मिलीमीटर पाऊस झाला. गत वर्षी २९ जून २०१९ ला जिल्ह्याची चेरापुंजी घाटघर येथे ११५ मिलीमीटर म्हणजे पावणेपाच इंच पाऊस पडल्याची नोंद होती. यंदा मात्र पावसाच्या आगारातच पावसाने दडी मारल्याने भात उत्पादक आदिवासी शेतकºयांची चिंता वाढली आहे.तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील डोंगर-शिखरांशी ढगांची झुंबी होत मान्सून सक्रिय होण्याची वाट शेतकरी पाहत आहे. जोराचा पाऊस आला तरच तरारलेल्या भात रोपांची आवणी सुरु होईल. 

भंडारदरा धरणात सोमवारी नव्या २३ तर  १ जून २०२० पासून ८३४ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. मात्र वीजनिर्मिती चालू प्रकल्प असल्याने भंडारदरा धरणातून ८१९ क्युसेकने निळवंडेत पाणी सोडले जात आहे. १९८ दलघफू क्षमतेचा आंबीत लघु पाटबंधारे तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तालुक्यातील इतर तेरा छोटे लघुपाटबंधारे प्रकल्प मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुळानदी वाहती होत पिंपळगावखांड प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली, मात्र ती अल्प आहे. चार दिवसांपूर्वी तालुक्यात शुक्रवारी २५ तारखेला अकोले शहर परिसरात ६६ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. वातावरणातील उकाडा वाढला आणि आकाशात ढग जमा होताना दिसत आहेत, पण पाऊस बरसत नाही अशी स्थिती होती. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी सायंकाळी उशिरा पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. भाताची रोपे तरारली असून भातशेती मशागतीलाही काही ठिकाणी सुरुवात झाली आहे.  भंडारदरा धरणात २ हजार ८५० दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात ३ हजार ९२० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आजमितीस आहे. १ हजार ६० दलघफू क्षमतेच्या आढळा धरणात ३८० पाणीसाठा आहे. मुळा धरणाचा सध्याचा पाणीसाठा ७ हजार ३३४ दलघफू असून यंदा केवळ ५१२ दलघफू नव्या पाण्याची आवक आतापर्यंत झाली आहे. पाऊस सुरु होताच तालुक्यातील रस्त्यांमधील खड्ड्यांची तोंड उसवू लागली आहेत. अकोले परिसरात खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने गाळ राबडीतून गाड्यांना वाट काढावी लागत आहे.