शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाचा उजवा कालवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:32 IST

उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणाचा उजवा कालवा शुक्रवारी बंद करण्यात आला आहे़ उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी साठ्याचा वापर करण्यात आला आहे़

राहुरी : उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणाचा उजवा कालवा शुक्रवारी बंद करण्यात आला आहे़ उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी साठ्याचा वापर करण्यात आला आहे़ पाणलोट व लाभक्षेत्रावर पाऊस थांबल्याने शेतकरी हतबल झाला असून सर्वांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून १ हजार ४५३ क्युसेकने श्ोतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू होते़ एका बाजूला दोन्ही कालव्यातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू होते़ सध्या मात्र धरण पाणलोटात १५ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. याशिवाय धरण लाभक्षेत्रात दोन महिन्यापासून पाऊस नसल्याने आवर्तन ऐन पावसाळ्यात सुरू करण्यास पाटबंधारे खात्याला भाग पाडले.पाणलोट क्षेत्रावर पाऊस थांबल्याने धरणाच्या पाण्याची पातळी घटू लागली आहे़ गणेश उत्साहात पाऊस हजेरी लावील, अशी शेतकऱ्यांची इच्छा होती़ मात्र पावसाने अंगठा दाखविल्याने धरणातील पाण्याची पातळी घटू लागली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या १९ हजार ६४७ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे.  मुळा धरण ७६ टक्के भरले आहे़ धरणात उपयुक्त पाण्याचा साठा १५ हजार ६४७ दशलक्ष घनफूट इतका आहे़ कोतूळ येथे २९९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे़ मुळानगर येथे ३३३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. या आठवड्यात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.  त्यामुळे शेतकरी वर्ष अडचणीत आले आहेत़मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ४४ दिवस शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले़ मुळा धरणाच्या पाण्याची पातळी खाली जात आहे़ धरणात ७६ टक्के पाण्याचा साठा आहे़ ७० टक्के पाणी साठा उपयुक्त आहे़ उन्हाळयात आवर्तनाची गरज भासणार आहे़भविष्यात दमदार पावसाची अपेक्षा आहे़ वरिष्ठांच्या आदेशानुसार उजवा कालवा बंद करण्यात आला आहे़ डावा कालवा गेल्या आठवड्यात बंद करण्यात आलेला आहे.- -अण्णासाहेब आंधळे, शाखा अभियंता, मुळा धरण.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर