शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मुळा ४० तर भंडारदरा ४९ टक्के भरले

By admin | Updated: July 12, 2016 00:02 IST

अहमदनगर : धरण पाणलोटात मुसळधार पाऊस झाल्याने मुळा, प्रवरा नदीला पूर आला आहे. भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासांत दुपटीने वाढ झाली़

अहमदनगर : धरण पाणलोटात मुसळधार पाऊस झाल्याने मुळा, प्रवरा नदीला पूर आला आहे. भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासांत दुपटीने वाढ झाली़ मुळा ४० तर भंडारदरा ४९ टक्के भरले आहे. पुणे जिल्ह्यातील येडगाव धरणातून सोमवारी कुकडी प्रकल्पात २७ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले़ दरम्यान, प्रशासनाने कोपरगाव, राहुरी, राहाता, श्रीरामपूर, नेवासा, पारनेर, संगमनेरमधील काही भागात दक्षतेचा इशारा दिला आहे़ नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नांदूर मध्यमेश्वरमधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडले आहे. अकोल्यातील कळसूबाई, रतनगड, हरीशचंद्रगडाच्या डोंगररांगात पावसाचे थैमान सुरू होते़ पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरातील पाणीसाठा ५ हजार दशलक्ष घनफुटावर पोहोचला आहे़ तर मुळाचा पाणीसाठा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ९ हजार ६०० दशलक्ष घनफृट होता. पुणे जिल्ह्यातील येडगाव धरणातून कुकडी प्रकल्पात २७ हजार २०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़ याशिवाय दौंड पुलावरून १८ हजार १७४ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे़ पावसाचा जोर सोमवारी कमी झाला़ पण, नद्या व धरणांतील पाण्याची आवक सायंकाळपर्यंत सुरूच आहे़ अकोले तालुक्यातील शेंडी, राजूर, ब्राम्हणवाडा, समशेर, कोतुळ आणि वीरगाव परिसरात ५० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली़ श्रीरामपूर शहरासह उंदिरगाव, बेलापूर आणि टाकळीभान परिसरातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे़ कोपरगाव शहरासह पोहेगाव, सुरेगाव परिसरातही पाऊस झाला़ राहाता शहरासह पुणतांबा, शिर्डी मंडलात पावसाने थैमान घातले आहे़ याशिवाय जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नगर आणि नेवासा तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे़ पुढील २४ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.(प्रतिनिधी)नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलागोदावरी नदीच्या काठावरील राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा तालुक्यातील गावांना दक्षतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.नदी दुथडी भरून वाहत असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे़ मुळा नदीवरील मांडवे पुल पाण्याखाली गेल्याने पारनेर व संगमनेर तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे़ याशिवाय भीमा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे़९ मंडलात अतिवृष्टी ४सुरेगाव, कोतूळ, समशेरपूर, ब्राम्हणवाडा, शेंडी, अकोले शहर, शिर्डी, राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे़