सद्यस्थितीत कृषिपंप वीजजोडणी देण्याकरिता उच्चदाब वितरण प्रणाली योजना ५ मे १०१८ च्या शासन निर्णयान्वये कार्यान्वित आहे. उच्चदाब वितरण प्रणालीचे प्रगती इतर पद्धतीने वीज जोडणी यावर येणारी मर्यादा याचा विचार करता यापुढे संभाव्य कृषिपंप अर्जदाराने करिता सर्वंकष नवीन कृषिपंप धोरण प्रस्तावित करण्यात आले होते. नवीन वीजजोडणी व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अत्यावश्यक नियोजन व कारवाई करण्यात येईल. लघुदाब कृषिपंप ग्राहकांच्या वीज बिलाबाबत तक्रारी असल्यास त्या कृषिपंप ग्राहकांचे मागील कमाल पाच वर्षांपर्यंतचे वीजबिल दुरूस्ती उपविभागीय स्तरावर करण्यात येईल. अशा ग्राहकांनी भरलेले वीजबिलाची रक्कम सुधारित देयकांमध्ये समायोजित करण्यात येईल. अशा वीजबिल दुरूस्तीसाठी उपविभागीय अधिकारी रुपये एक लाख व त्यापुढील रकमेसाठी कार्यकारी अभियंता हे सक्षम अधिकारी असतील. या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना थकबाकीवर व्याज व विलंब शुल्काची आकारणी केली जाणार नाही. परंतु ग्राहकाने चालू वीज भरणे बंधनकारक आहे. सर्व कृषी ग्राहकांना वीज भरण्याच्या सुविधेसाठी ग्रामपंचायत सहकारी साखर कारखाना सूतगिरणी विविध सहकारी संस्था महिलाच बचतगट यांची मदत घेण्यात येणार आहे.
....
सदर योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. नवीन वीजजोडणी व मागील थकीत वीजबिल भरणा याबाबत शेतकऱ्यांनी या योजनेचा नक्कीच फायदा घ्यावा.
-किसन कोपनर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण.