शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

३९०० कोटींचा सुधारित प्रकल्प अहवाल : कुकडी प्रकल्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 15:40 IST

सात तालुक्यांना वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील रखडलेले मुख्य कालवे, चाºयांची कामे तसेच भूसंपादनापोटी शेतकºयांचे थकलेले पैसे देण्यासाठी जलसंपदा विभागाने सुमारे ३ हजार ९०० कोटी खर्चाचा सुधारित प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : सात तालुक्यांना वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील रखडलेले मुख्य कालवे, चाºयांची कामे तसेच भूसंपादनापोटी शेतकºयांचे थकलेले पैसे देण्यासाठी जलसंपदा विभागाने सुमारे ३ हजार ९०० कोटी खर्चाचा सुधारित प्रकल्प अहवाल तयार केला आहे. तो अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच कुकडी प्रकल्पाचे भाग्य उजळणार आहे.या अहवालात डिंबे-येडगाव कालवा अस्तरीकरण व विस्तारीकरण, तुकाई चारी, चौंडी चारी यांचा समावेश आहे. मात्र डिंभे माणिकडोह बोगद्याचा समावेश नाही. श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, करमाळा तालुक्यातील अर्धवट सर्व कामांचा यात समावेश आहे. धरणांचे गेट व वॉल भराव दुरूस्ती तसेच कार्यालयीन इमारती तसेच नारायणगाव, कोळवडी व श्रीगोंदा येथील विभागीय विश्रामगृहाची दुरूस्ती करण्यात येणार आहे. कुकडी प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे, पिंपळगाव जोगे या पाच धरणांचा समावेश आहे. या धरणांवर लहान मोठे नऊ कालवे आहेत. या कालव्यांद्वारे आंबेगाव, जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, करमाळा या तालुक्यातील सुमारे १ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पण गेटची मोडतोड, कालवा व चाºयांना अस्तरीकरण नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती वाढली होती. त्यामुळे सिंचन आवर्तनावर गंभीर परिणाम झाला होता. अर्धवटकामे पूर्ण करण्यासाठी किंवा दुरूस्तीअभावी ही कामे १५वर्षांपासून रेंगाळली होती.पालकमंत्री राम शिंदे यांनी कुकडी प्रकल्पातील सिंचनातील अडचणीचा अभ्यास करून या प्रकल्पाचा सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना जलसंपदा विभागास दिल्या होत्या. त्यानुसार हा अहवाल तयार झाला आहे. यामुळे कुकडी प्रकल्पातील रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.कुकडी प्रकल्प शेतकºयांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. सुधारित प्रकल्प अहवाल प्रलंबित असल्याने कुकडीची काही कामे अर्धवट राहिल्यामुळे सिंचनावर परिणाम झाला होता. सुधारित प्रकल्प अहवाल मंजूर झाला की अर्धवट कामे व भूसंपादनाची कामे मार्गी लावता येतील. - प्रा. राम शिंदे, पालकमंत्री, अहमदनगर.

प्रकल्पाची वैशिष्ट्येप्रकल्पाची एकूण क्षमता - ३७ टी एम सीउपयुक्त क्षमता ३१ टी एम सीवाया जाणारे पाणी ७ टी एम सी एकूण सिंचन क्षेत्र १लाख ५६हजार २७८हेक्टरप्रत्यक्षात सिंचन क्षेत्र १लाख ३२हजार, ५६६हेक्टरएकूण कालवे ९,एकूण लांबी ६२३ किमीडावा कालवा २४९किमी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर