उपायुक्त डांगे यांनी स्वीकारला पदभार
अहमदनगर : महापालिकेच्या उपायुक्तपदाचा यशवंत डांगे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. डांगे यांची उपायुक्तपदी बदली झाली होती. परंतु, त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. सहायक आयुक्त संतोष लांडगे यांच्याकडील उपायुक्त कर या पदाचा भार डांगे यांनी स्वीकारला.
...
डांबरीकरणाच्या साहित्याची चाचणी
अहमदनगर : शहर व परिसरातील रस्त्याची कामे सुरू करण्यापूर्वी डांबरासह इतर साहित्याची चाचणी करण्यात आली. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे, उपअभियंता मनोज पारखे, शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते.
....
दिल्लीगेट रस्त्याचे काम सुरू
अहमदनगर : नेप्तीनाका ते दिल्लीगेट रस्त्याच्या कामाला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सोमवारी सुरुवात करण्यात आली. विविध शासकीय योजनांसाठी खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचेही काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
.....
कामाच्या मंजुरीसाठी धावपळ
अहमदनगर: महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार कामांना मंजुरी देण्यात आली असून, कामांना प्रशासकीय मंजुरी घेण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. त्यात देयके मिळत नसल्याने कामे घेण्यास ठेकेदार तयार नसल्याने नगरसेवकांची अडचण झाली आहे.
....
बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी
अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावरल पथदिवे बंद असून, हे दिवे सुरू करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी वाहनांची वर्दळ असते. पथदिवे बंद असल्याने या मार्गावर कमालीचा अंधार असतो. त्यामुळे पथदिवे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी पुढे येत आहे.