आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सध्या कोरोना लसीकरण सुरू असून, लस घेतल्यानंतर १४ दिवस रक्तदान करता येत नसल्याने युवकांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले होते. शिबिरात १५३ जणांनी रक्तदान केले. यावेळी माजी सभापती अशोकराव झरेकर, रामदास आढागळे, सुनील कोकरे, भाऊसाहेब काळे, वैभव लंके, कालिदास भापकर, मोहन काळे, सिद्धांत आंधळे, अरुण जाधव, सचिन कदम, राहुल वाघ, परशुराम गुंजाळ, संभाजी पवार, सचिन कराळे, सतीश तांबे, राम सानप, सागर जाधव, सचिन गंगार्डे, अभिजित भिल्ल, रवी घनवटे, विशाल लवांडे, राम थोरात, अक्षय बांबरकर, अमित येवले, मुकुंद बोरकर, सागर भालसिंग आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST