शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

आरक्षण उपयुक्त पण गुणवत्ताही सिद्ध करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:42 IST

सामाजिक व शैक्षणिक मागासांचा स्वतंत्र प्रवर्ग तयार करून त्यातून राज्य शासनाने नोकऱ्या व शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा केला आहे़

अरुण वाघमोडेअहमदनगर : सामाजिक व शैक्षणिक मागासांचा स्वतंत्र प्रवर्ग तयार करून त्यातून राज्य शासनाने नोकऱ्या व शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा केला आहे़ या कायद्याला मुंबई उच्च न्यायालयानेही मान्यता दिली़ आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तूर्त स्थगिती न देता दिलासा दिला आहे़ मराठा आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश व नोकऱ्यांबाबत मात्र सध्या काही प्रमाणात संभ्रम आहे़ या पार्श्वभूमीवर अ‍ॅड़ शिवाजी कराळे यांच्याशी मराठा आरक्षण या विषयावर ‘लोकमत’ने संवाद साधलाप्रश्न : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास उशीर झाला का ?उत्तर : मराठा समाजाची महाराष्ट्रात मोठी लोकसंख्या आहे़ सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या विचार करता या समाजाला खूप आधीपासून आरक्षण मिळणे गरजेचे होते़ प्रत्यक्षात मात्र मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले़प्रश्न : आरक्षणावर अजूनही टांगती तलवार आहे का?उत्तर : शासनाने कायद्याच्या चौकटीत बसवून इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले आहे़ उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैधठरवत नोकºयांमध्ये १३ तर शिक्षणामध्ये १२ टक्के असे प्रमाण ठरविले आहे़ या आरक्षणाला सध्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे़ सर्वोच्च न्यायालयानेही आरक्षण कायद्यास स्थगिती न देता पुढील दोन आठवड्यांनी सुनावणी ठेवली आहे़ त्यामुळे आरक्षणावर टांगती तलवार आहे असे म्हणता येणार नाही़प्रश्न : आरक्षणाचा कितपत लाभ होईल ?उत्तर : नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळाल्याने त्या राखीव जागांवर मराठा समाजातील मुलांना संधी मिळणार आहे़ यातून शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे़ मात्र केवळ आरक्षणावर अवलंबून न राहता आपली गुणवत्ताही सिद्ध करावी़प्रश्न : आरक्षणातून नोक-या आणि शैक्षणिक प्रवेशाबाबत संभ्रम आहे का?उत्तर : मराठा आरक्षणाचा कायदाच संमत झालेला आहे़ त्यामुळे सरकारी नोकºयांमध्ये आता जागा राखीव राहतील़ शैक्षणिक प्रवेशाबाबतही नियमावली आहे़ या आरक्षणाच्या माध्यमातून आधी दिलेल्या नियुक्त्यांबाबत काही प्रमाणात संभ्रम होऊ शकतो़ त्याबाबत निर्णय होईल़ या पुढील काळात मात्र संभ्रम होण्याचा प्रश्नच नाही़ विद्यार्थी व नोकरीसाठी अर्ज करणाºयांनी नव्याने लागून झालेले मराठा आरक्षण समजून घ्यावे़मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्याने एका मोठ्या सामाजिक संघर्षाला पूर्ण विराम मिळाला आहे़ कायद्याच्या चौकटीतही हे आरक्षण टिकणार आहे़ येणाºया काळात मराठा समाजातील तरुण पिढीला याचा लाभ होणार आहे़ - अ‍ॅड़ शिवाजी कराळे

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर