शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी कृषी विद्यापीठात संशोधन- रसायनाशिवाय तयार होणार गूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:33 IST

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने को. एम. ९०५७ ही जात संशोधित केली आहे. सेंद्रिय गूळनिर्मितीसाठी ही जात मैलाचा दगड ठरणार असून, १२ ते १४ महिन्यांत ती पक्व होते.

भाऊसाहेब येवलेराहुरी : महाराष्ट्रातील गूळ उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने को. एम. ९०५७ ही जात संशोधित केली आहे. सेंद्रिय गूळनिर्मितीसाठी ही जात मैलाचा दगड ठरणार असून, १२ ते १४ महिन्यांत ती पक्व होते.सध्या गुळासाठी को ९२००५ ही जात वापरली जाते. मात्र कोल्हापूर वगळता राज्याच्या इतर भागांत या जातीची वाढ व्यवस्थित होत नाही. याशिवाय तांभेरा व तपकिरी ठिपक्यांमुळे गूळनिर्मितीस मर्यादा आल्या होत्या. या त्रुटी दूर करीत खास भेंडीपासून सहज गूळनिर्मितीसाठी पाडेगाव केंद्राने नवीन जात संशोधित केली आहे. मध्यम ते भारी जमिनीत व काही प्रमाणावर चोपण जमिनीवरही ही जात चांगली येते. सेंद्रिय गुळाची देशभर मागणी वाढू लागली आहे़ शेतकऱ्यांना दर्जेदार गूळनिर्मितीसाठी उसाची गरज होती़ त्या दृष्टिकोनातून पाडेगाव केंद्रात सात वर्षांपासून संशोधन सुरू होते़ केवळ भेंडीचा वापर करून तयार केलेला दर्जेदार गूळ परदेशात निर्यात करणे शक्य होणार आहे.

को. एम. ९०५७ उसाचे वैशिष्ट्ये

कोणत्याही रसायनाशिवाय फक्त भेंडीचा वापर करून ए ग्रेडच्या गुळाची निर्मिती शक्य, सरळ वाढ तसेच खोल व काळया जमिनीत लोळत नाही, पाण्याचा ताण सहन करते,वाढ्यावर अजिबात कूस नाही,उसाची जाडी ८३.१७ मिलिमीटर,सरासरी वजन १.६४ किलो, इतर जातीपेक्षा अधिक उत्पादन,कांडी किडीस कमी प्रमाणावर बळी पडते, पानावर तपकिरी ठिपके व तांभेरा या रोगास कमी बळी पडते. तुरा उशिराने व कमी प्रमाणावर येतो, पाचरट सहज निघते, त्यामुळे ऊसतोडणी सहज होते.

को. एम. ९०५७ ही नवीन उसाची जात खास गुळासाठी तयार केली असून, हे वाण सध्या महाष्ट्रात प्रसारित होईल.एप्रिल अथवा मे मध्ये विद्यापीठांच्या बैठकीत हे वाण ठेवण्यात येणार आहे़ त्यानंतर मान्यता मिळणार आहे़ अन्य उसापेक्षा को. एम. ९०५७ या वाणापासून १० ते १२ किलो अधिक गूळनिर्मिती होत आहे. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या मार्गदर्शनानुसार संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या देखरेखीखाली याचे संशोधन करण्यात आले आहे.-डॉ. आनंद सोळंके , प्रमुख ऊस पीक शास्त्रज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी