शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

डाळिंबावरील तेल्या रोगावर संशोधन गरजेचे

By admin | Updated: February 3, 2015 17:31 IST

डाळिंबावर तेल्या रोगामुळे आलेले संकट दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या रोगावर संशोधन करणे गरजेचे हवे असे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

शिर्डी : डाळिंबावर तेल्या रोगामुळे आलेले संकट दूर करण्यासाठी राज्याचा कृषी विभाग व कृषी विद्यापीठांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या रोगावर संशोधन करून ते शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचवावे, असे प्रतिपादन राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शिर्डी येथे केले.कृषी विद्यापीठांसाठी सरकारने दिलेल्या हजारो एकर जमिनी पडिक आहेत. तेथील संशोधनाचा लाभ शेतकर्‍यांना झाला असता तर आत्महत्येचे प्रमाण रोखता आले असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. शिर्डी येथे सुरू असलेल्या डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या डाळिंब परिसंवाद व प्रदर्शनाचा समारोप सोमवारी लोणीकर यांच्या हस्ते झाला. आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार राहुल आहेर, प्रदेशाध्यक्ष रविंद्र नवलाखा, उपाध्यक्ष अरुण देवरे, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. हरिहर कौसाडीकर, डाळिंबरत्न बाबासाहेब गोरे, फलोत्पादनचे संचालक डॉ. सुदाम अडसूळ, शिर्डीचे उपनगराध्यक्ष निलेश कोते आदींची उपस्थिती होती.आपण स्वत: शेतकरी असल्याने शेतकर्‍यांच्या समस्या आपणास माहीत आहेत. शेतकरी टिकला तरच देशाची प्रगती होणार असल्याने लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन भविष्यकाळात शेती व्यवसायाला संरक्षण व उद्योगाचा दर्जा प्राप्त करून द्यावा, असे आवाहन लोणीकर यांनी केले.आगामी काळात राज्य सरकार आणि डाळिंब संशोधन केंद्राशी एकत्रित विचारविनिमय करून डाळिंब उत्पादकांचे प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाहीही लोणीकर यांनी दिली.देशातील तीर्थक्षेत्रे स्वच्छ करण्याचा निर्धार नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्या शहरांमध्ये शिर्डीचा अंतर्भाव व्हावा, यासाठी प्रयत्न करू, येथे घनकचर्‍याची समस्या असून घनकचरा प्रकल्पाकरिता केंद्राकडून निधी आणण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.आ. कोल्हे म्हणाल्या की, डाळिंब परिसंवादामुळे शेतकर्‍यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. डाळिंब उत्पादकांनी अधिक उत्पन्न मिळवण्याकरता उपपदार्थ निर्मितीवर भर देऊन त्याचे मार्केटिंग करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनीही मनोगत व्यक्त केले. संघाचे संचालक खेमराज कोर यांनी प्रास्ताविकात शेतकर्‍यांच्या समस्या मांडल्या. लोणीकर यांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)

 ■ देश-विदेशातील आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन विद्यापीठांनी डाळिंबाचे रोगमुक्त नवीन वाण विकसित करावे, डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संरक्षण मिळावे, त्यांना अनुदानावर खत व औषधे मिळावीत, यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा घडवून आणण्याचे आश्‍वासन लोणीकर यांनी दिले.