शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

काष्टीत उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: November 7, 2016 00:51 IST

काष्टी : घोड व भीमा नद्यांच्या पवित्र संगमावर असलेला काष्टी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुला झाला़ या गटात साखर व वाळू सम्राटांचा दरारा आहे़

काष्टी : घोड व भीमा नद्यांच्या पवित्र संगमावर असलेला काष्टी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुला झाला़ या गटात साखर व वाळू सम्राटांचा दरारा आहे़ या गटात उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे़ त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळते, कोण दुसऱ्या गटात जाऊन उमेदवारी मिळवतो, यावर तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत़ काष्टी जि़ प़ गटावर नेहमीच माजी मंत्री बबनराव पाचपुते गटाचे वर्चस्व राहिले आहे़ मात्र २००६ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत पाचपुते यांचे खंद्दे समर्थक माजी सभापती अरूणराव पाचपुते यांना विखे यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब गिरमकर यांनी शिवाजीराव नागवडे यांच्या राजकीय कृपाशीर्वादाने १६४ मतांनी पराभवाची धूळ चारली होती़ २०११ च्या जि़ प़ निवडणुकीत प्रतिभा बबनराव पाचपुते यांनी बाळासाहेब गिरमकर यांच्या पत्नीचा सुमारे १ हजार ७०० मतांनी पराभव करून जि़ प़ मध्ये एन्ट्री केली आणि विकास कामांची झलक दाखविली़ काष्टी गट हा सर्वसाधारण प्रवगार्साठी खुला झाला आहे़ मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने या गटात पुन्हा दिग्गज महिलांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे़ या गटात भाजपकडून जि़प़ सदस्या प्रतिभा पाचपुते, साजन पाचपुते, सुवर्णा पाचपुते, प्रताप भगवानराव पाचपुते, लक्ष्मण नलगे तर काँग्रेसकडून बाळासाहेब गिरमकर, अरूणराव पाचपुते, अनिल पाचपुते, लताबाई पाचपुते, धनसिंग भोयटे यांच्या नावाची चर्चा आहे़माजी सभापती अरूणराव पाचपुते, जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक अनिल पाचपुते यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ त्यामुळे नागवडे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे़ मात्र हा गट माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा गड आहे़ त्यामुळे फुटलेल्या सुभेदारांचा कस अटळ आहे़मागील जि़प़ निवडणुकीत बाळासाहेब गिरमकर यांच्या पत्नीस काष्टी वगळता सर्व गावांमध्ये आघाडी मिळाली होती़ मात्र काष्टीकरांनी गिरमकर यांचे स्वप्न धुळीस मिळवले़ गिरमकर यांनी मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी जोरदार फिल्डींग लावण्यास सुरुवात केली़ मागील निवडणुकीचा अनुभव जमेला ठेवून नागवडे गट व्यूहरचना आखणार असल्याची चिन्हे आहेत़ पाचपुते गटाकडून प्रतिभा पाचपुते यांचे नाव सध्या आघाडीवर आहे़ मात्र तरूण मतदारांची वाढलेली संख्या विचारात घेऊन या गटात युवा कार्ड वापरले जाऊ शकते़ काष्टी पं़ स़ गण हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाला आहे़ त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या घटली आहे़ लिंपणगाव पं़स़ गण हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपकडून काष्टीचे पोपटराव माने यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत़ काँग्रेसकडून तीन नावे पुढे आली आहे़