शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

निमोणमधील २१ जणांचे अहवाल निगेटिव्ह, ग्रामस्थांचा जीव भांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:41 IST

तळेगाव दिघे (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला, तर आणखी एक पुरुष व एक महिला कोरोना बाधित आहे. त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील २१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आले.

तळेगाव दिघे (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला, तर आणखी एक पुरुष व एक महिला कोरोना बाधित आहे. त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील २१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आले. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी निमोण गावात कडकडीत लॉकडाऊन सुरु आहे.कोरोनाबाधितांच्या संपर्कातील २१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती संगमनेर तालुका पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिली. त्याशिवाय पिंपळे येथील एका व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी गुरुवारी दुपारी निमोण येथे भेट देवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेतली. प्रांताधिकारी मंगरुळे यांनी सबंधित अधिकारी व कर्मचारी यांना दक्षतेच्या सूचना दिल्या. ग्रामविकास अधिकारी एस. वाय. मिसाळ, बबन सांगळे यावेळी उपस्थित होते. निमोण गावच्या ४३२५ लोकसंख्येपैकी कोरोना बाधित क्षेत्रातील १३७७ लोकसंख्येसाठी आरोग्य विभागाची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे रोज आरोग्य सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निमोण गावात चौदा दिवसांसाठी लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. गावातील अंतर्गत रस्ते रोखण्यात आले आहेत. कोरोनाबाधित परिसर सील करण्यात आला आहे. गावात सध्या पोलीस पथकही तैनात आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन कोरोना सुरक्षा समितीने केले आहे.