शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट बाजरी बियाणाचा अहवाल रखडला; खडकवाडी, कामठवाडीच्या शेतक-यांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:13 IST

स्प्रिंहा कंपनीचे एस ३०१ बाजरी बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यामुळे कणसाला अत्यल्प दाणे भरल्याने पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडीमधील सुमारे ४० ते ४५ शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत कृषी अधिका-यांच्या चौकशी समितीचा अहवाल रखडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विनोद गोळे ।  पारनेर : स्प्रिंहा कंपनीचे एस ३०१ बाजरी बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यामुळे कणसाला अत्यल्प दाणे भरल्याने पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडीमधील सुमारे ४० ते ४५ शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत कृषी अधिका-यांच्या चौकशी समितीचा अहवाल रखडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडी येथील शेतक-यांनी स्प्रिंहा बायोस्कील कंपनीचे एस-३०१ बाजरी बियाणे घेऊन पेरणी केली होती. मात्र या बाजरीच्या कणसांमध्ये दाणे कमी प्रमाणात भरल्याचे शेतक-यांच्या लक्षात आले. शेतक-यांनी याबाबत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे प्रमुख संतोष वाडेकर, प्रवक्ते राजेंद्र रोकडे यांच्याकडे ही माहिती दिली. वाडेकर, रोकडे यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना सांगितल्यावर १५ आॅक्टोबर रोजी उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ एन. एस. उगले, महाबीजचे पुरुषोत्तम फाटे, मंडल कृषी अधिकारी व्ही. एन. पवार, पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही. एन. उघडे यांची चौकशी समितीने प्रत्यक्ष शेतक-यांच्या शेतात जाऊन बाजरी पिकाची व कणसाची पाहणी केली. त्यानंतर दोन दिवसात अहवाल येऊन बियाणे निकृष्ट असेल तर शेतक-यांना नुकसान भरपाई मिळेल, असे समितीने सांगितले होते.चौकशी समितीसमोर फिरवला पिकांवर रोटावेटरकामठवाडी, खडकवाडी परिसरातील शेतकºयांनी बाजरीच्या पिकावर रोटावेटर फिरवला. यावेळी शेतकºयांना आपले अश्रू अनावर झाले. पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडी परिसरातील शेतक-यांच्या त्या बाजरी पिकांचे नमुने घेतले आहेत. अहवाल आल्यानंतर निर्णयदोन दिवसात अहवाल येईल. चौकशी समितीचा अहवाल अद्याप आमच्याकडे आलेला नाही. आम्ही शेतक-यांसाठीच आहोत. अहवाल आल्यानंतर निर्णय होईल, असे कर्नाटक येथील कंपनीचे विभाग अधिकारी प्रसाद व उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी सांगितले.    

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAhmednagarअहमदनगर