शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या प्रशासक काळातील श्वेतपत्रिका काढा, माजी जि. प. सदस्य झावरे यांची मागणी 

By चंद्रकांत शेळके | Updated: July 24, 2023 22:50 IST

झावरे यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांची भेट घेतली.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : जिल्हा परिषदेत सदस्य किंवा पदाधिकारी होते तेव्हा विकासकामांबाबत त्यांचे लक्ष होते. परंतु गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकांमार्फत सुरू आहे. या काळात अनेक अधिकारी, त्यांचे कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करून विकासकामांत अनियमितता करीत आहेत. त्यामुळे प्रशासक काळातील श्वेतपत्रिका जि. प. प्रशासनाने काढावी, अशी मागणी माजी जि. प. सदस्य सुजित झावरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे केली.

झावरे यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांची भेट घेतली. त्यात त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून विविध कामांच्या निविदा धूळखात पडून आहेत. यात संबंधित अधिकारी या निविदा विशिष्ट ठेकेदाराला काम मिळत नाही म्हणून उघडत नाहीत. बांधकाम विभागात विशिष्ट कर्मचाऱ्यांची चलती असून हा प्रकार गंभीर असून, शासन निर्णयाची पायमल्ली होत आहे. बांधकाम विभागासारखीच स्थिती पाणीपुरवठा विभागाची आहे. तेथेही जलजीवनच्या अनेक कामांबाबत तक्रारी आहेत.

पूर्वी जिल्हा परिषदेत पदाधिकारी आणि सदस्य चुकीच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. परंतु आता प्रशासक असल्याने या अधिकाऱ्यांना मोकळे रान आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सेस, पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान आणि त्याच्या व्याजाचे नियोजन याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने श्वेतपत्रिका काढावी, अशीदेखील मागणी झावरे यांनी केली. याबाबत आपण चौकशी करून दखल घेऊ, असे आश्वासन येरेकर यांनी दिल्याचे झावरे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर