पावसाळा सुरू झाला आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. रिमझिम पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. ग्रामीण भागात गावात आणि अनेकांच्या घरांतही पावसाचे पाणी साचलेले असते. त्यामुळे हिवताप विभागाने जुलै महिना हा डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणूनच जाहीर केला आहे. या अंतर्गत प्रत्येक गावात १० टक्के घरांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिल्या आहेत. त्यानुसार सध्या सर्वेक्षण सुरू असून, उपाययोजनाही राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे दोन संशयित होते, त्यांची तपासणी केली असता दोन्ही पॉझिटिव्ह आढळले. चिकुनागुण्याचे मात्र ११ नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये नऊजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले.
-------------
जिल्ह्यात जुलै महिन्यात प्रत्येक तालुक्यात डेंग्यूबाबत सर्वेक्षण, तपासणी व चाचण्या सुरू आहेत. सुदैवाने जिल्ह्यात आतापर्यंत एकही डेंग्यूचा रुग्ण आढळून आलेला नाही. जुलै महिना हा डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून प्रशासन जिल्ह्यात उपाययोजना करीत आहे, तसेच नागरिकांमध्येही चांगली जागृती असल्याने एकही डेंग्यूचा रुग्ण आढळून आला नाही.
-डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा हिवताप अधिकारी.
-----------------
चाचण्यांचा तपशील (२०२१)
महिना डेंग्यू संशयित पॉझिटिव्ह चिकुनगुण्या नमुने चिकुनगुण्या पॉझिटिव्ह
जानेवारी ९ १ २ २
फेब्रुवारी ४ ० १ १
मार्च २ ० ५ ५
एप्रिल ० ० ३ ३
मे ० ० ० ०
जून १ १ ० ०
जुलै २ २ ११ ९
एकूण १८ ४ २२ २०
-------------
या आहेत उपाययोजना सुरू
रुग्ण आढळून आल्यास टेमीफॉस या अळीनाशकाची फवारणी
रुग्णालयाच्या ठिकाणी औषधे उपलब्ध
सर्व ताप रुग्णांची तपासणी व उपचार मोफत
ताप रुग्णास त्वरित औषधोपचाराची सोय
विषाणूजन्य ताप असल्याने प्रतिबंधासाठी कोणतीही लस नाही
औषधोपचारासाठी विशिष्ट औषध उपलब्ध नाही
तापनिवारक, वेदनाशामक औषधे वापरता येतील
उपचार म्हणून सलाईन, प्रतिजैवके घेऊ नयेत
--------------