शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

राहुरीत प्राध्यापकास पट्ट्याने जबर मारहाण : दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 11:46 IST

सलूनच्या दुकानात सुरू असलेल्या गाण्याचा आवाज कमी करण्याचे सांगितल्याचा राग आल्याने सलून दुकानातील दोघाजणांनी प्राध्यापकाचा डोळा फोडला.

राहुरी : सलूनच्या दुकानात सुरू असलेल्या गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितल्याचा राग आल्याने सलून दुकानातील दोघाजणांनी प्राध्यापकाचा डोळा फोडला. ही घटना राहुरी शहरात शुक्रवार(२३ नोव्हेंबर) रोजी घडली. याबाबत बुधवारी(२८ नोव्हेंबर) रोजी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राध्यापक दीपक सुभाष निर्मळ यांना मारहाण करणा-या अमोल बाळासाहेब कदम व मयुर दत्तात्रय कदम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान राहुरी येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक असलेले दीपक सुभाष निर्मळ हे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर हॉटेल अमर शेजारी क्लास घेत होते. तेव्हा त्यांच्या क्लासच्या खाली असलेल्या सलूनच्या दुकानात टेपवर मोठ्या आवाजात गाणी सुरू होते. प्राध्यापक निर्मळ यांनी आवाज कमी करण्यास सांगितले. याचा राग आल्याने सलून दुकानातील अमोल कदम व मयुर कदम या दोघांनी निर्मळ यांना मारहाण केली. या मारहाणीत निर्मळ यांच्या डोळ्याला जबर मार लागला.निर्मळ यांच्या फिर्यादीवरून अमोल कदम व मयुर कदम यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव करत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी