शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन झोनमधून आलेल्यांसाठी क्वारंटाईनचा आदेश शिथिल करा-पोपटराव पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 11:12 IST

अहमदनगर : रेड, आॅरेंज झोनमधून खेड्यात येत असलेल्या लोकांमुळे ग्रामीण भागातील शिस्तीचा भंग होत आहे. अशा लोकांना त्यांच्या स्वत:च्या घरातच क्वारंटाईन करावे. मात्र जे नागरिक ग्रीन झोनमधून इतर गावात येतात, अशा नागरिकांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची अट शिथिल करावी, अशी मागणी आदर्श हिवरेबाजारचे सरपंच तथा राज्य आदर्श गाव समितीचे सरपंच पोपटराव पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : रेड, आॅरेंज झोनमधून खेड्यात येत असलेल्या लोकांमुळे ग्रामीण भागातील शिस्तीचा भंग होत आहे. अशा लोकांना त्यांच्या स्वत:च्या घरातच क्वारंटाईन करावे. मात्र जे नागरिक ग्रीन झोनमधून इतर गावात येतात, अशा नागरिकांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची अट शिथिल करावी, अशी मागणी आदर्श हिवरेबाजारचे सरपंच तथा राज्य आदर्श गाव समितीचे सरपंच पोपटराव पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनाच थेट पत्र पाठवले आहे. या पत्रात पवार यांनी म्हटले आहे की,  ५ मे २०२० रोजीच्या अहमदनगरचे तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसार आता शेजारील गावातून आपल्या गावात आलेल्या पाहुण्यांनासुद्धा क्वारंटाईन करण्यात येत आहे. शेजारील गावचे पाहुणे एक ते दोन दिवसांसाठी ये-जा करीत असतात. बाहेरून हॉटस्पॉट किंवा रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना त्यांच्या स्वत:च्या घरीच क्वारंटाईन करण्यात यावे. कारण सध्या शहरातून खेड्याकडे येणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाची लागण होऊ शकते. तसेच ग्रामीण भागातील शिस्तीचा भंग होवून वादविवाद वाढतील. त्यामुळे आतापर्यत सुरक्षित असलेली गावेसुद्धा असुरक्षित होऊ शकतात. ३० मे पर्यंत लॉकडाऊन शिस्तीने पाळलयास कोरोना आटोक्यात येण्यास नक्कीच मदत होईल. तसेच ग्रामपंचायतीकडे अत्यावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. रेड झोनमधून आलेल्यांना प्राथमिक शाळेत ठेवण्यात येते. ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे असे वाटत नाही. मात्र ग्रीन झोनमधून आलेल्या नागरिकासाठी संस्थात्मक विलीगीकरणाचा आदेश शिथिल करण्यात यावा.