शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेहकुरी अभयारण्य ईज ग्रेट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 16:31 IST

हिरवाईने नटलेला परिसर, अभयारण्यात मनसोक्त फिरणारे हरणांचे कळप, येथे असलेली समृद्ध निसर्ग संपदा हे पाहून आॅस्ट्रेलियातील परदेशी पाहुणे खुश झाले. ‘रेहकुरी अभयारण्य ईज ग्रेट’ असा शेरा मारून आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : हिरवाईने नटलेला परिसर, अभयारण्यात मनसोक्त फिरणारे हरणांचे कळप, येथे असलेली समृद्ध निसर्ग संपदा हे पाहून आॅस्ट्रेलियातील परदेशी पाहुणे खुश झाले. ‘रेहकुरी अभयारण्य ईज ग्रेट’ असा शेरा मारून आपल्या भावना व्यक्त केल्या.  मूळचे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मात्र तीनशे वर्षापूर्वी इंग्रजांनी विजय शर्मा यांच्या आजोबांना जनावरे राखण्यासाठी चिली देशात घेऊन गेले. तेव्हापासून या कुटुंबातील एकही सदस्य भारतात आला नाही. विजय शर्मा यांच्या कुटुंबिय चिली सोडून आॅस्ट्रेलियात स्थायिक झाले. व्यवसायाने शिक्षक असलेल्या विजय शर्मा यांनी तेथे आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रशिक्षक बनले. यामाध्यमातून त्यांची मायभूमी असलेल्या भारत देशाशी संबंध आले. देशातील विविध ऐतिहासिक गोष्टींचा आॅनलाईन अभ्यास केला. यामध्ये त्यांना देशातील अनेक ठिकाणे आवडली. त्यांची पाहणी करण्यासाठी ते भारतात सहकुटुंब आले. त्यांनी रेहकुरी अभयारण्याला भेट दिली.यावेळी वनक्षेत्रपाल मनिषा भिंगे, राउंड फॉरेस्ट आॅफिसर विठ्ठल घालमे, बंगला माळी, नाना सत्रे, माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्यातील नातेपुते येथील आर्ट आॅफ लिव्हिंगचे शिक्षक डॉ. रणजित फुले, मेट्रो मल्टिस्टेटचे अध्यक्ष राहुल सोनमाळी, रोटरी क्लब आॅफ कर्जत मेट्रोचे अध्यक्ष मच्छिंद्र अनारसे, सचिव विकास सातपुते, डॉ. मधुकर कोपनर, राम ढेरे, कुंडलिक कवडे, दिलीप भोज उपस्थित होते. यानंतर परदेशी पाहुण्यांचा रोटरी क्लब आॅफ कर्जत मेट्रोच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...विजय शर्मा यांनी कुटुंबियासह कर्जत तालुक्यातील रेहकुरी अभयारण्य, कर्जतचे ग्रामदैवत संत सद्गुरु गोदड महाराज, श्री क्षेत्र सिध्दटेक येथे भेटी देऊन पाहणी करुन दर्शन घेतले. कर्जत तालुक्यातील रेहकुरी अभयारण्य पाहून परदेशी पाहुणे भारावून गेले. येथील समृद्ध निसर्ग संपदा या अभयारण्यात मनसोक्त बागडणारे हरीण, काळवीट व इतर प्राणी पाहून पाहुणे खूष झाले. त्यांना वन विभागाच्या अधिका-यांनी व कर्मचारी यांनी माहिती दिली. अभयारण्यात असलेल्या टॉवरवर जाऊन त्यांनी प्राणी व पक्षी निरीक्षण केले. कर्जतच्या भेळीचा आस्वाद घेतला. 

 

आर्ट आॅफ लिव्हिंगमुळे तीनशे वर्षानंतर मायदेशात येण्याची संधी मिळाली. येथील विविध ठिकाणे पाहून समाधान वाटले. आॅनलाईन माहितीमुळे येण्याचा मोह आवरला नाही.      -विजय शर्मा, आॅस्ट्रेलिया.