शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात पालिका कर्मचा-यांना रजेचा संसर्ग: प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 19:31 IST

नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी सतत आजारपणाच्या रजेवर जात असल्याने प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे विकास कामे ठप्प होऊन नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

रियाज सय्यदकोपरगाव : नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी सतत आजारपणाच्या रजेवर जात असल्याने प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे विकास कामे ठप्प होऊन नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. रजेवर जाणा-या अधिकारी व कर्मचा-यांना असा कोणता आजार जडला? हा मात्र संशोधनाचा विषय आहे.पालिकेत आधीच मनुष्यबळाची वाणवा आहे. शहराचा विस्तार बघता पालिकेला आणखी सक्षम अधिकारी व कर्मचा-यांची आवश्यकता आहे. पाणी पुरवठा विभागाचे सहायक अभियंता प्रवीण लोखंडे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने ३ महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. पाणी पुरवठ्याचे पर्यवेक्षक विश्वास धुमाळ दीड-दोन महिन्यांपासून आजारपणाच्या रजेवर आहेत. कनिष्ठ अभियंता श्रीकांत बगाड देखील महिनाभरापासून रजेवर गेल्याने रामभरोसे कारभार सुरू आहे. बांधकाम अभियंता विजय पाटील यांच्याकडे पाणी पुरवठ्याचा तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. आधीच त्यांच्यावर बांधकामसह अतिक्रमण विरोधी पथक प्रमुखाची जबाबदारी आहे. सरकारी कामानिमित्त पाटील यांना बाहेरगावी जावे लागते. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.एम.ताजवे दीड महिन्यींपासून रजा टाकून गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ कनिष्ठ अभियंता श्रीकांत साठे हे देखील महिन्यापासून रजेवर आहेत. आरोग्य निरीक्षक पी.एम. चव्हाण यांची अचानक टपाल विभागात बदली केल्याने कोपरगावकरांचे आरोग्य वा-यावर आहे.

तोकडा कर्मचारी वर्ग

नगरपालिकेत मुख्याधिकारी, सहायक कार्यालयीन पर्यवेक्षक, सहायक लेखापाल, बांधकाम नगर अभियंता, पाणी पुरवठा उपअभियंता, सहायक कर निरीक्षक, कनिष्ठ पर्यवेक्षक, ग्रंथपाल, कनिष्ठ विद्युत पर्यवेक्षक, सहायक खरेदी पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, मार्केट लिपिक, आस्थापना लिपिक, सभा लिपिक, दप्तर लिपिक, आवक-जावक लिपिक, ग्रंथालय लिपिक, कनिष्ठ प्रोग्रामर, संगणक चालक, न्यायालय लिपिक, २ वैद्यकीय अधिकारी, राज्य उपजिवीका अभियान लिपिक असा तोकडा स्टाफ आहे.

प्रशासन चालविण्याची जबाबदारी मुख्याधिका-यांवर आहे. नवीन अभियंत्यांना तात्पुरत्या नियुत्या देण्याचा अधिकार त्यांना आहे. पण, कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही. ही त्यांची बेफिकिरी आहे. प्रशासनाच्या गलथानपणामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. पालिकेविषयी तक्रारी वाढून लोकप्रतिनिधी बदनाम होत आहेत. ठेकेदाराची बिले अदा न केल्याने पाणी पुरवठा जलवाहिनीचे ‘लिकेज’ निघत नाहीत. आरोग्य निरीक्षक पी.एम.चव्हाण यांची बदली केल्याचे मला माहीत सुध्दा केले नाही. मुख्याधिका-यांच्या मनमानीला अधिकारी व कर्मचारी कंटाळले आहेत.-विजय वहाडणे, नगराध्यक्ष

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव