शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीचे आवर्तन लांबले : शेतक-यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 16:14 IST

कुकडी कालव्याचे आवर्तन थेट १० नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गणेशोत्सव काळात भरपूर पाऊस येऊन, वेळेवर कांदा लागवडी होतील, असे शेतक-यांचे अपेक्षित नियजन होते.

निघोज : कुकडी कालव्याचे आवर्तन थेट १० नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गणेशोत्सव काळात भरपूर पाऊस येऊन, वेळेवर कांदा लागवडी होतील, असे शेतक-यांचे अपेक्षित नियजन होते. परंतु गणेशोत्सवात पाऊस न झाल्याने लागवडी योग्य झालेली कांद्याची रोपे पाण्याअभावी लावायचे कशी? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.परिसरात पाऊस नसतानाच आता कुकडीचे आवर्तन लांबले आहे. नेहमी कालवा भरून वाहणा-या निघोज बागायती पट्टयात दहा वर्षात पहिल्यांदाच पाण्याअभावी कांदा लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतक-यांनी कुकडीच्या आवर्तनाचे पाणी मिळण्यासाठी पाणी मागणी अर्ज निघोजच्या कुकडी सिंचन शाखेत वेळेत सादर करावेत, असे आवाहन कुकडी पाटबंधारे उपविभागच्या सहायक अभियंता एस.यु.डुंबरे व निघोजचे सिंचन शाखाधिकारी एम. ए. दिघे यांनी केले आहे.

कुकडी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत येणा-या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टिएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे शेतक-यांनी पिकांचे नियोजन करावे. शेतक-यांनी अर्ज भरून पाण्याची मागणी करून पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. पाण्याची मागणी असल्यास आम्हाला सरकारी पातळीवर पाठपुरावा करता येतो. दसºयाला पाऊस झाल्यास पाणी लवकरही सोडण्यात येऊ शकते.-एस.यु.डुंबरे, सहाय्यक कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव.

निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्थेच्या वतीने शेतक-यांना पाण्याचे महत्त्व पटवून देऊन कुकडी पाटबंधारे विभागाकडे पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाण्याची मागणी करण्यासाठी जनजागृती करणार आहे. शेतक-यांची पाण्याची मागणी असल्यास आम्हालाही शासकीय पातळीवर भांडता येते. - माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, अध्यक्ष, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्था.

निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्थेच्या वतीने शेतक-यांना पाण्याचे महत्त्व पटवून देऊन कुकडी पाटबंधारे विभागाकडे पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाण्याची मागणी करण्यासाठी जनजागृती करणार आहे. शेतक-यांची पाण्याची मागणी असल्यास आम्हालाही शासकीय पातळीवर भांडता येते. - माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, अध्यक्ष, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्था.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर