शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

नोकर भरती प्रकरण : सहकार विभागाने मागविला जिल्हा बँकेकडून खुलासा, ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या नोकरभरतीत गुणवत्ता यादीत येऊनही विशाल बहिरम या उमेदवाराला बँकेने नियुक्तपत्र न पाठविल्याने याबाबत नाशिकच्या सहकार सहनिबंधकांनी बँकेकडून खुलासा मागविला आहे. ३० जूनपर्यंत बँकेला हा खुलासा सादर करावयाचा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या नोकरभरतीत गुणवत्ता यादीत येऊनही विशाल बहिरम या उमेदवाराला बँकेने नियुक्तपत्र न पाठविल्याने याबाबत नाशिकच्या सहकार सहनिबंधकांनी बँकेकडून खुलासा मागविला आहे. ३० जूनपर्यंत बँकेला हा खुलासा सादर करावयाचा आहे. 

बहिरम या उमेदवाराने अनुसूचित जमाती प्रवर्गात ज्युनिअर आॅफिसर या पदासाठी बँकेची परीक्षा दिली होती. तो गुणवत्ता यादीत आला. मात्र, बँकेचे नियुक्तीपत्रच त्याला मिळाले नाही. याबाबत त्याने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांची भेट घेऊन आपले गाºहाणे मांडले. मात्र, त्यानंतरही बँकेने त्याची दखल घेतली नाही. याऊलट बहिरम याला आम्ही नियुक्तीपत्र पाठविले होते मात्र, तो हजर झाला नाही, असा दावा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले आहे. बँकेने आपणाला जे नियुक्तीपत्र पाठविले त्याची पोहोच दाखवावी, असे आवाहन बहिरम याने केले आहे. 

मात्र, तशी पोहोच बँक दाखवू शकलेली नाही. आम्ही साध्या टपालाने नियुक्तीपत्र पाठविले होते, असे बँकेचे म्हणणे आहे. बँकेने नियुक्ती पत्र पाठविले नाही, तसेच बँकेचे संकेतस्थळ अथवा मेलद्वारेही भरतीबाबत नंतरच्या काळात काहीच माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आपण नियुक्तीला मुकलो असल्याची बहिरम याची तक्रार आहे. या तक्रारीवर बँकेने काय कार्यवाही केली हा अहवाल नाशिकच्या विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर यांनी बँकेकडे मागितला आहे. बँकेने साध्या 

--------------टपालाने नियुक्तीपत्र का पाठवले? बहिरम याला नियुक्तीपत्र पाठविल्याचा कोणता पुरावा बँक सहनिबंधकांना सादर करणार ? याबाबत उत्सुकता आहे. बहिरम याला शासनाने व बँकेने न्याय न दिल्यास अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक अ‍ॅड. अरुण जाधव यांनी केलेली आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbankबँक