शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात वाळूतस्करांकडून तीन कोटीचा दंड वसूल; श्रीगोंदा तालुका आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 19:11 IST

नगर जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ३१ डिसेंबरअखेर महसूल प्रशासनाने वाळूतस्करांकडून २ कोटी ९३ लाखाचा दंड वसूल केला. यामध्ये सर्वाधिक दंड श्रीगोंदा तालुक्यात ४८ लाख १८ हजार तर सर्वात कमी नेवासे तालुक्यात १ लाख ६८ हजाराचा दंड वसूल केला आहे.

श्रीगोंदा : नगर जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ३१ डिसेंबरअखेर वाळूतस्करांच्या विरोधात महसूल प्रशासनाने कारवाई केली. ७०६ वाळूची चोरटी वाहने पकडली. त्यांच्याकडून २ कोटी ९३ लाखाचा दंड वसूल केला. यामध्ये सर्वाधिक दंड श्रीगोंदा तालुक्यात ४८ लाख १८ हजार तर सर्वात कमी नेवासे तालुक्यात १ लाख ६८ हजाराचा दंड वसूल केला आहे.वाळूची तस्करी करणारी सर्वाधिक १३३ वाहने संगमनेर तालुक्यात पकडण्यात आली. त्यांच्याकडून ४१ लाख ९८ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. नेवाशात अवघी चार वाहने पकडण्यात आली. नगर तालुक्यात ३८ लाख, नेवासा १ लाख ६८ हजार, शेवगाव ८ लाख ९ हजार, श्रीगोंदा ४८ लाख १८ हजार, पारनेर ३५ लाख १६ हजार, संगमनेर ४१ लाख ९८ हजार ,अकोले ४ लाख ५२ हजार, कोपरगाव ३२ लाख ३३ हजार, राहाता ९ लाख ३२ हजार, श्रीरामपूर १० लाख ९० हजार, राहुरी २३ लाख ५३ हजार, कर्जत २० लाख २२ हजार, जामखेड ६ लाख ९८ हजार, असा दंड वाळूतस्करांकडून वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक पोलीस स्टेशनला १५२ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यामध्ये श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ११० वाळूतस्करांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.शासनाला गोदावरी, मुळा, प्रवरा, भीमा, घोड, सीना आदी नद्यातील वाळू साठ्यांच्या लिलावातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत होता. अलीकडे वाळू लिलावात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वाळूतस्करीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बेकायदा वाळू उपशातून मिळणारी दंडाची रक्कम वाढली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा