शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

अंगणवाडीसेविकांचे रेकाॅर्ड मोबाइलवरून पुन्हा रजिस्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:26 IST

अहमदनगर : वारंवार बिघाड होत असल्याने, तसेच क्षमता कमी असल्याने अंगणवाडीसेविकांनी आपले मोबाइल शासनाला परत केले आहेत. त्यामुळे अंगणवाडीसेविकांना ...

अहमदनगर : वारंवार बिघाड होत असल्याने, तसेच क्षमता कमी असल्याने अंगणवाडीसेविकांनी आपले मोबाइल शासनाला परत केले आहेत. त्यामुळे अंगणवाडीसेविकांना दैनंदिन रेकाॅर्ड मोबाइलवरून पुन्हा रजिस्टरवर घेण्याची वेळ आली आहे. नगर जिल्ह्यात एकूण ५ हजार ५५५ अंगणवाडीसेविकांपैकी १,९३८ अंगणवाडीसेविकांनी मोबाइल परत केले आहेत.

अंगणवाडीतील पोषण आहार व त्यासंबंधीची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी सरकारकडून अंगणवाडीसेविकांना मोबाइल देण्यात आले आहेत. पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनंदिन आहार, गृहभेट नियोजन, शिधावाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन मासिक प्रगती अहवाल याबाबतची सर्व माहिती अंगणवाडीसेविकांना ऑनलाइन पद्धतीने बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे पाठविणे बंधनकारक आहे. मात्र, त्यामध्ये विविध अडचणी येत असल्याने सेविकांनी मोबाइल परत केले.

मोबाइल परत केल्याने ऑनलाइन पद्धतीने अहवाल पाठविणे बंद झाले आहे. सध्या जिल्ह्यात पोषण माह अभियानाची व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. या अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, कार्यक्रमांची माहिती ऑनलाइनऐवजी आता ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी केंद्रातून बालविकास प्रकल्प स्तरावर पाठविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा कामाचा ताण वाढला आहे.

------------

जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या - ५,५५५

अंगणवाडीसेविका - ५,५५५

किती जणींनी केला मोबाइल परत - १,९३८

--------------

म्हणून केले मोबाइल परत

निकृष्ट दर्जाचे मोबाइल, मोबाइलमधील रॅम कमी असल्याने हँग होणे, दुरुस्तीचा खर्चही मोठा, शिवाय पोषण ट्रॅक ॲपवर मराठी भाषेचा अभाव आदी कारणांमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोबाइल परत केले आहेत.

------------

मोबाइल वारंवार हँग होत असल्याने कामे होत नव्हती. उलट कामांमध्ये या मोबाइलमुळे व्यत्यय येत होता, शिवाय गरम होणे, वारंवार बंद पडणे, रॅम कमी असल्याने हँग होणे असे प्रकार व्हायचे. त्यामुळे मोबाइल परत केले.

- शोभा पवार, अंगणवाडीसेविका, कोल्हार, ता.राहुरी.

---------------

त्या मोबाइलवधील पोषण ट्रॅक ॲपवर मराठी भाषेची सोय नाही. त्यामुळे अहवाल भरताना अडचणी यायच्या. मोबाइल वारंवार हँगही होत. त्यामुळे मोबाइल परत केले. आता नवीन रजिस्टर घेऊन त्यात अहवाल भरला जात आहे.

- रतनताई गोरे, अंगणवाडीसेविका, कारेगाव, ता.श्रीरामपूर

--------------

५ हजार ५५५ पैकी १९३८ अंगणवाडीसेविकांनी मोबाइल परत केले आहेत. पोषण ट्रॅक ॲपमध्ये मराठी भाषेची सोय नाही, याबाबत कर्मचाऱ्यांचा आक्षेप होता. तसे शासनाला कळविले आहे.

- मनोज ससे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग.

-----------------

तालुका अंगणवाडीसेविका मोबाइल परत केलेल्या सेविका

अकोले ३४० २९०

राजूर २६२ २२३

संगमनेर १६५ ३१

घारगाव १ २३१ १२८

घारगाव २ १६६ ४३

कोपरगाव २५० ०

राहाता ३१८ ७४

श्रीरामपूर २६२ २२२

राहुरी ३६२ ०

नेवासा २४८ ०

वडाळा १९३ ०

नगर १ १९६ ०

नगर २ २९ १०

भिंगार १६९ २७

शेवगाव ३२५ ०

पाथर्डी २९२ ०

कर्जत ३८१ ३२४

जामखेड २७७ १०१

श्रीगोंदा २६२ २११

बेलवंडी १५३ १५३

पारनेर ४१२ १११

---------------------------

एकूण ५,५५५ १,९३८