शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांविरुध्द श्रीगोंद्यात बंड

By admin | Updated: March 19, 2016 00:09 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदाच्या नगराध्यक्षा छाया गोरे यांनी सत्तेची खुर्ची टिकविण्यासाठी वेळोवेळी विरोधकांशी हातमिळवणी केली.

श्रीगोंदा : श्रीगोंदाच्या नगराध्यक्षा छाया गोरे यांनी सत्तेची खुर्ची टिकविण्यासाठी वेळोवेळी विरोधकांशी हातमिळवणी केली. महिला नगराध्यक्षा असताना दिरच कारभार करीत आहे. या मनमानी कारभाराला धडा शिकविण्यासाठी आपण भाजपा प्रणित शहर विकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नगरसेवक सुनील वाळके यांनी दिली. नगरसेवक वाळके यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना पत्र दिले. वाळके माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे नजीकचे नातेवाईक आहेत. त्यांनी बंडाचे निशाण फडकविण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सत्ताधारी गोटात खळबळ उडाली आहे . आम्ही माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या आदेशानुसार छाया गोरे यांना एक वर्षासाठी नगराध्यक्ष पद दिले. एक वर्षानंतर नगराध्यक्षांनी राजीनामा देण्यास नकार दिला. परिणामी उपनगराध्यक्ष अख्तारभाई शेख, अर्चना गोरे विरोधात गेले. पाचपुते यांनी नगराध्यक्षांना राजीनामा देण्याची अनेकदा विनंती केली, मात्र नगराध्यक्षांनी नेत्याचाही शब्द पाळला नाही. आपण यापुढे बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे, मात्र नगराध्यक्षा गोरे यांचा गैरकारभार चव्हाट्यावर आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बबनराव पाचपुते यांनी बाबासाहेब भोस यांची मर्जी सांभाळण्यासाठी नगराध्यक्षा छाया गोरे यांना बळ दिले. आता नगरसेवक वाळके यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नगराध्यक्षांची पुन्हा कोंडी झाली आहे. उपनगराध्यक्ष अख्तारभाई शेख, नगरसेविका अर्चना गोरे यांचे पती राजू गोरे, सुनील वाळके यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. वाळके यांच्या बंडाला या मैत्रीची किनार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे . (तालुका प्रतिनिधी)