शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तपसाधनेमुळे दिव्य अनुभवाची प्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:08 IST

नवपद आराधनेत सम्यक पद तपाला महत्व आहे. सिध्दचक्र तपसाधनेमुळे दिव्य अनुभव प्राप्त होतात. मंत्र, यंत्र, लब्धी आदी शक्तिशाली तत्वाचा या तपसाधनेत समावेश आहे. सिध्दचक्र तपाने मन:शांती मिळते.

सन्मतीवाणीनवपद आराधनेत सम्यक पद तपाला महत्व आहे. सिध्दचक्र तपसाधनेमुळे दिव्य अनुभव प्राप्त होतात. मंत्र, यंत्र, लब्धी आदी शक्तिशाली तत्वाचा या तपसाधनेत समावेश आहे. सिध्दचक्र तपाने मन:शांती मिळते. जिनशासनाच्या आराधनेमुळे सुख, शांती, समाधान प्राप्ती होते. सिध्दचक्राची तपसाधना कठीण आहे. परंतु श्रध्दापूर्वक केली तर अपेक्षित फळ मिळते. नवपदातील सम्यक तप सिध्दचक्र हे सर्वांत महत्वाच्या स्थानी आहे. सर्व विश्वाचे सार नवपदात आहे. नऊ तत्वांची आराधना म्हणजे नवपदाची आराधना करणे होय. नवपदाची गाडी आपल्याला मोक्षाच्या स्थानकाकडे नेते. नवपद आराधनेमुळे सुख-शांतीबरोबर रोग निवारण होऊ शकते. लब्धीचक्राच्या तपामुळे पुरुषार्थ केल्याचा अनुभव मिळतो. सशाजधना केल्याने कर्माची निर्जरा होते. या आराधनेमुळे सिध्दत्व प्राप्त होते. सिध्दचक्र हृदयात स्थापन करा. श्रीपाल, मैनासुंदरी यांनी ही आराधना सर्वांना सांगितली. चैत्र व आश्विन या दोन महिन्यातच ही साधना करतात. त्यामुळे अनंत सिध्दीकडे जाण्याचा मार्ग खुला होतो. हृदयात स्थापन केलेल्या सिध्दचक्र स्वरुपी कमळाच्या प्रत्येक एका पाकळीचे नऊ दिवस ध्यान करा. त्याचा प्रभाव जाणवतो. वेगळे अनुभव मिळतील. या आराधनेमुळे जीवनाला नवीन दृष्टी मिळते. या आराधनेमुळे तीर्थकरांच्या पायाशी सर्व वैभवाने लोळण घेतली. सिध्दचक्राची आराधना हे एक पुण्यकर्म आहे.     - पू.श्री.सन्मती महाराज

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAhmednagarअहमदनगर