शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर मतदारांची विशेष मोहिमेकडे पाठ

By admin | Updated: July 25, 2016 00:08 IST

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेकडे मतदारांनी पाठ फिरविली आहे़

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेकडे मतदारांनी पाठ फिरविली आहे़ जिल्हाभरात दुसऱ्या दिवशी राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत एक हजार मतदारांनी अर्ज सादर केले असून, माहिती न देणाऱ्या मतदारांचा आकडा ‘जैसे थे’ आहे़ त्यामुळे ऐन निवडणुकीच्यावेळी मोठा पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत़नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक डिसेंबरमध्ये होत आहे़ निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा निवडणूक शाखेकडून सुरू करण्यात आली आहे़ त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात मतदारयादी अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ या मोहिमेंतर्गत ज्या मतदारांचे जुन्या यादीत नाव आहे, त्यांनी छायाचित्रासह २० मुद्यांची माहिती सादर करणे अपेक्षित आहे़ मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून वेळोवेळी सूचना देवूनही अद्याप माहिती प्राप्त झाली नाही़ आतापर्यंत ७९ हजार मतदारांपैकी २५ हजार मतदारांचीच माहिती प्राप्त झाली आहे़ उर्वरित ५४ हजार मतदारांनी अद्याप छायाचित्र व इतर माहिती प्रशासनाकडे दिली नाही़ त्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने मंडलस्तरावर विशेष मोहीम हाती घेतली़ या मोहिमेचा रविवारी दुसरा दिवस होता़ पहिल्या दिवशी १ हजार १५७ अर्ज प्राप्त झाले़ दुसऱ्या दिवशीही माहिती देण्यासाठी मतदार घराबाहेर पडले नाहीत़ दिवसभरात १ हजार २५ मतदारांनीच छायाचित्र व इतर २० मुद्यांची माहिती दिली असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी दिली़ जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ही मोहीम राबविण्यात आली आहे़ महसूलच्या सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांनी शासकीय सुटी न घेता मोहीम राबविली़ मात्र मतदार माहिती घेऊन आले नाहीत़ त्याचबरोबर गावातून रिक्षाही फिरविण्यात आली़ परंतु मतदारांमध्ये निरुत्साही वातावरण असल्याचे यावरून स्पष्ट होते़ काही ठिकाणी तरी कर्मचाऱ्यांनी मतदारांच्या घरी जावून माहिती घेतली असल्याचे याविषयी माहिती देताना उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले़ ते म्हणाले, जिल्ह्यात प्रभावीपणे ही मोहीम राबविण्यात आली़ माहिती न देणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे़ छायाचित्रासह मतदारयादी अद्ययावत करणे बंनधकारक आहे़ परंतु, जिल्ह्यात मतदारांकडून प्रतिसाद मिळत नाही़ मात्र निवडणुका जवळ आल्यानंतर हेच मतदार तक्रारी करतात़ त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विशेष मोहीम हाती घेण्यात आली़ (प्रतिनिधी)