शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
6
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
7
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
8
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
9
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
10
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
11
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
12
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
13
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
14
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
15
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
16
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
17
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
18
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
19
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
20
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

‘आरसी बुक’ अभावी वाहन नोंदणी लटकली

By admin | Updated: March 16, 2016 23:57 IST

अहमदनगर : वाहन खरेदीनंतर आरटीओकडून वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) हे स्मार्ट कार्डच्या रुपात दिले जायचे. आता हे कार्ड तयार करण्याचे कंत्राट संपल्याने जुन्या पुस्तिकांचे वाटप केले.

अहमदनगर : वाहन खरेदीनंतर आरटीओकडून वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) हे स्मार्ट कार्डच्या रुपात दिले जायचे. आता हे कार्ड तयार करण्याचे कंत्राट संपल्याने जुन्या पुस्तिकांचे वाटप केले. मात्र या पुस्तिकाही आता संपल्याने आरटीओ कार्यालय बुचकळ््यात पडले आहे. आणखी महिनाभर तरी वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळणार नसल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे.वाहन खरेदी केल्यानंतर त्याची आरटीओकडे नोंदणी होते. ही नोंदणी झाली आहे, याबाबत पूर्वी गुलाबी, फिकट निळ््या रंगाचे आर.सी. बुक (पुस्तिका)मिळायचे. त्यामध्ये वाहनाचा आणि वाहनमालकाचा सर्व तपशील असायचा. यालाच वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आर.सी. बुक) असे म्हटले जाते. पुस्तिका बंद करून दोन-तीन वर्षांपासून हे प्रमाणपत्र स्मार्ट कार्डच्या स्वरुपात मिळत होते. मागील सरकारच्या काळातील कार्ड तयार करणाऱ्या कंत्राटदाराची मुदत संपली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या मोटार वाहन विभागाने स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. मात्र त्याला अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. सध्या स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम बंद आहे. नगर येथील आरटीओ कार्यालयाने जुने आर. सी. बुक वापरात आणले. त्याही पुस्तिका संपल्याने अधिकारी, वाहनमालक, एजंट गोंधळले आहेत. आर.सी. बुकची छपाई करायची ठरली तरी त्याला किमान एक महिना लागणार आहे. स्मार्ट कार्डबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी किती दिवस लागणार,याबाबत सध्या तरी काहीही सांगता येत नाही. दरम्यान पुढच्या महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती असे सण असल्याने वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्या वाहनधारकांना नेमके कोणते कार्ड देणार, याबाबत सध्या गोंधळाची स्थिती आहे. (प्रतिनिधी)वाहन नोंदणी कागदावरवाहन नोंदणी प्रमाणपत्र (आर.सी. बुक) हे स्मार्ट कार्डच्या स्वरुपात देणे बंद झाल्याने जुन्या पुस्तिकांचे वाटप केले आहे. मात्र त्याही पुस्तिका आता संपल्या आहेत. नव्या पुस्तिका छापण्याबाबतचा निर्णय राज्यस्तरावरून घेतला जातो. त्यामुळे आर.सी. बुक आता नेमके कोणत्या स्वरुपात दिले जाणार आहे, याबाबत स्थानिक पातळीवर कोणतीही माहिती नाही. वाहनाची नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी आरटीओला सहकार्य करावे. ज्यांनी नोंदणी केली, त्यांना त्यांचे प्रमाणपत्र पुस्तिका किंवा स्मार्ट कार्ड आल्यास दिले जाईल. सध्या तात्पुरत्या स्वरुपात कागदपत्र दिले जात आहेत. -राजाराम गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी