शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेहकरीत दोन गटात राडा : चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 13:31 IST

नगर तालुक्यातील मेहेकरी येथील महलदरा येथे शेतातील बांधावरून दोन गटात राडा झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत महिलेसह चार जण जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादीत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर: नगर तालुक्यातील मेहेकरी येथील महलदरा येथे शेतातील बांधावरून दोन गटात राडा झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत महिलेसह चार जण जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादीत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सतीश महादेव वणवे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीसांनी राजेंद्र अर्जुन अव्हाड, बाळू अर्जून आव्हाड व अर्जुन रतन आव्हाड यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शेतातील बांधवरील झाडे तोडल्याने सतीष वणवे याचा भाऊ सुभाष याच्यावर कुºहाडीने वार करून मारहाण केली. या घटनेत सतीष यांच्यासह सुभाष महादेव वनवे व युवराज सतीष वणवे हे जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेप्रकरणी दुसरी फिर्याद शीतल राजेंद्र आव्हाड (वय २४) यांनी दाखल केली आहे. यामध्ये पोलीसांनी सतीष महादेव वनवे, सुभाष महादेव वनवे, उषा सतीष वनवे व जनाबाई सुभाष वनवे यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. शेतीचा बांध का कोरला असे विचारणा करून चौघा जणांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक डी. बी. पालवे हे करत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस