शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

नाट्यगीतांनी रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST

अहमदनगर : वर्ष २०२० हे कोरोनामुळे मैफलीविनाच गेले. वर्षभर कार्यक्रम झाले नसल्याने गायक आणि रसिकांनाही चुकल्यासारखेच वाटले. मात्र, बंदिश ...

अहमदनगर : वर्ष २०२० हे कोरोनामुळे मैफलीविनाच गेले. वर्षभर कार्यक्रम झाले नसल्याने गायक आणि रसिकांनाही चुकल्यासारखेच वाटले. मात्र, बंदिश सांगितिक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने नगरमधील सावेडीत नाट्यगीते आणि शास्त्रीय संगीताची मैफल रंगली. यामध्ये रसिक-श्रोते मंत्रमुग्ध झाले.

सावेडीमधील रावसाहेब पटवर्धन स्मारकात बंदिश सांगितिक प्रतिष्ठानच्यावतीने न्यू आर्टस् कॉलेजचे संगीत विभागप्रमुख नीलेश खळीकर यांचा ‘स्वरगंध’ कार्यक्रम पार पडला. यावेळी बंदिश सांगितिक कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण डहाळे, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक गांधी, सचिव सुमेधा देशपांडे, अविनाश देऊळगावकर, अविनाश बोपर्डीकर, हेमंत काळे, राम शिंदे, अविनाश कुलकर्णी, धनश्री खरवंडीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रारंभी श्रीगणेश, शारदा देवीचे पूजन, दीपप्रज्वलन झाले. हमीरा रागातील ‘चमेली फुली चंपा’ या बंदिशीने मैफलीचा प्रारंभ झाला. विलंबित झुमरा तालातील हा बडा ख्याल व ‘चंचल चपल मदमाती’ या दृत एक तालातील चिजेने सभागृहातील वातावरण भारावले. त्यानंतर बसंत रागातील ‘फुगवा ब्रीज देखन को चलो री’ ही बंदिश बहारदार झाली. भिवाला या रागामध्ये ‘ऋत बसंत सखी अपने उमंग’, ‘फेर आये मोरा अबुना पे’, ‘एरी पिहरवा घर आवो’ या तीन बंदिशी सादर झाल्या. ‘रंधात पेरली मी आषाढ दर्द गाणी व गुंतता हृदय हे’ ही नाट्यपदे रसिकांना आवडली.

राग मांडणीतील कल्पकता, तानेतील स्पष्टपणा व स्वरांचे सच्चेपण ही खळीकर यांच्या गायकीची वैशिष्ट्ये जाणवली. भैरवी रागातील ‘भोला मन जानी’ या निर्गुणी भजनाने या अविस्मरणीय मैफलीची सांगता झाली. या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. खळीकर यांना मकरंद खरवंडीकर (हार्मोनियम) कल्पेश अदवंत (तबला) तुषार भंडारे व आकाश गाडेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

सूत्रसंचालन प्रकाश कुलकर्णी यांनी केले तर अनघा पछाडे यांनी कलाकारांचा परिचय करुन दिला. वर्षा पंडित यांनी आभार मानले. या कार्यक्रमात महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटनेच्या नगर शाखाध्यक्षपदी परशुराम मुळे यांची निवड झाल्याबद्दल व पवन नाईक, लक्ष्मण डहाळे यांची सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

-------

फोटो -२५ बंदिश

सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारकात बंदिश सांगितिक कला प्रतिष्ठानच्या मैफलीत नीलेश खळीकर यांनी गायन सादर केले. त्यांना मकरंद खरवंडीकर (हार्मोनियम), कल्पेश अदवंत (तबला), तुषार भंडारे व आकाश गाडेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.