शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शारदीय नवरात्र उत्सवासाठी राशीन नगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:24 IST

राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणा-या राशीनच्या येमाई (जगदंबा) देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारपासून होणा-या घटस्थापना ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत चालणा-या आंनदोत्सवासाठी राशीन नगरी सज्ज झाली आहे. 

राशीन : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणा-या राशीनच्या येमाई (जगदंबा) देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारपासून होणा-या घटस्थापना ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत चालणा-या आंनदोत्सवासाठी राशीन नगरी सज्ज झाली आहे. हलत्या दीपमाळेसाठी प्रसिध्द असणारे व जागृत, स्वंयभू अशी कर्जत तालुक्यातील राशीनच्या येमाई देवीची ओळख आहे. यंदा देवी मंदिरात रविवारी पारंपरिक पध्दतीने घटस्थापना करण्यात येते. नऊ दिवस महावस्त्रालंकार पूजा, आरती-धुपारती, ललित पंचमी, दुर्गाष्टमी पासोडी पोत, होम-हवन, विजयादशमी पालखी सोहळा, कोजागरी पोर्णिमा भळांदे इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या आंनदोत्सवानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. मंदिर व शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाईचे काम सुरू आहे.मंदिर परिसरातील पूजेच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. बालगोपालांची मनोरंजनाची साधने, हॉटेल्स, कपड्यांची दुकाने यांची तयारी झाली आहे. यात्राकाळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, गुरव, पुजारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये दर्शन बारी, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहन पार्किंग व्यवस्था पिण्याचे पाणी, महामंडळाच्या ज्यादा बसेस, अंतर्गत रस्ते तसेच राशीनला जोडणारे राज्यमार्ग येणाºया भाविकांसाठी सुस्थितीत करणे, अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासह पेट्रोलिंग, वीज व्यवस्था आदी सुविधा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. भाविकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.२९ सप्टेंबरला घटस्थापना. नवरात्र प्रारंभ, २आॅक्टोबरला ललित पंचमी, सुवासिनी हळदी-कुंकु, ६आॅक्टोबला दुर्गाष्टमी पासोडी पोत, ७ आॅक्टोबरला घटोत्थापन नवरात्र सांगता, ८आॅक्टोबरला विजया दशमी, देवीला फुले लावणे, पालखी उत्सव, ९ आॅक्टोबर पालखी उत्सव, १३ आॅक्टोबर कोजागरी पोर्णिमा भळांदे उत्सव, असे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर