शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

राशीनला साथीच्या आजारांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:56 IST

राशीनसह (ता.कर्जत) परिसरात डेंग्यू, गोचीड ताप, स्वाईन फ्ल्यू सदृश आदी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

राशीन : राशीनसह (ता.कर्जत) परिसरात डेंग्यू, गोचीड ताप, स्वाईन फ्ल्यू सदृश आदी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शरिरातील पांढऱ्या पेशी (प्लेटलेट) कमी होणे, जंतुसंसर्गातून (व्हायरल इन्फेक्शन) होणाºया आजारांचेही प्रमाण वाढले आहे. याकडे प्राथमिक आरोग्य कें्रद, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. याकडे ग्रामपंचायत, आरोग्य प्रशासनाने लक्ष न दिल्यास शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.राशीन परिसरात साथीच्या विविध आजारांनी थैमान घातले आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने सर्वसामान्यांनाही खासगी रुग्णालयांचा पर्याय निवडावा लागतो. साथीच्या आजारांमुळे विविध तपासण्या कराव्या लागतात. त्यातून सर्वसामान्यांचे आर्थिक गणितही बिघडते. लहान मुलांतही सर्दी, खोकला व तापाचे प्रमाण वाढत आहे. ग्रामपंचायत स्तरावर धूर फवारणी, सार्वजनिक ठिकाणी जंतूनाशक फवारणी होते. मात्र आरोग्य यंत्रणेमार्फत राबविलेल्या प्राथमिक उपाययोजना त्रोटक स्वरूपात असतात. राशीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २७ गावे येतात. साथीच्या आजारावर आठवड्यातून एकदा सर्वे केला जातो. या आजाराविषयी कोणत्या उपाययोजना आहेत, याबाबत जनजागृती सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी अश्विनी वाल्हे यांनी सांगितले. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर मच्छरदाणी, लांब कपडे वापरावेत. डास चाऊ नये यासाठी काळजी घ्यावी, लक्षण आढळल्यास रूग्णांनी वेळेत उपचार घेऊन भरपूर पाणी प्यावे, असे त्यांनी सांगितले.साथीच्या आजाराबाबत वैद्यकीय अधिकारी अश्विनी वाल्हे यांना उपाययोजनेबाबत विचारले असता त्यांनी ग्रामपंचायतीशी काही पत्रव्यवहार झाला नसल्याचे सांगितले. तर ग्रामविकास अधिकारी कैलास तरटे यांनी आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार झाल्याचे सांगितले. यातून या दोन्ही विभागातील समन्वयाचा अभावच दिसून येतो.रूग्णांना ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला, डोळेदुखी, अंगावर पुरळ येणे, शरिरातील श्वेत पेशी कमी असे आढळल्यास आम्ही केंद्रात रक्त तपासणी करतो. इलाज सुरुच ठेऊन डेंग्यूची लक्षणे आढळल्यास आयजीजीजी, आयजीएम व एन १ एस १ साठी रक्ताचे नमुने नगर सिव्हिलला पाठवतो. - डॉ. अश्विनी वाल्हे, वैद्यकीय अधिकारी, राशीन प्राथमिक आरोग्य केंद्र

प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे. येथे औषधांचा नेहमीच तुटवडा भासतो. सध्या द्वितीय वर्गाचा वैद्यकीय अधिकारी आहे. पूर्णवेळ प्रथम दर्जाचा अधिकारी द्यावा, अन्यथा आंदोलन करू. -सुभाष जाधव, तालुका समन्वयक, शिवसेना

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर