शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यातील रणरागिनींनी रोखला बालविवाह; पोलिसांना पाहून व-हाडी मंडळींनी ठोकली धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 20:17 IST

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा नात्यातील मुलाबरोबर होणारा विवाह श्रीगोंद्यातील महिलांनी पोलिसांच्या मदतीने रोखला.

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा नात्यातील मुलाबरोबर होणारा विवाह श्रीगोंद्यातील महिलांनी पोलिसांच्या मदतीने रोखला.टाकळी कडेवळीत येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील बोरमलनाथ मंदिरात होणार होता. विवाहापूर्वी नव वधू-वरांना हळद लावली. वराची सवाद्य मिरवणूक काढली. नव वधू लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच श्रीगोंदा येथील रणरागिनी पोलिसांना घेऊन लग्नस्थळी पोहचल्या. पोलिसांना पाहून वºहाडी मंडळींनी धूम ठोकली. त्यानंतर नव वधू-वरांच्या आई, वडिलांना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह करणार नाही, असे लिहून घेत त्यांना सोडून दिले.अल्पवयीन मुलीच्या भावना विचारात न घेता विवाह निश्चित करण्यात आला. मुहूर्त ठरला़ पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या. ही माहिती मिरा शिंदे, अ‍ॅड. सुनीता पलिवाल, चांदणी खेतमाळीस, स्मिता साबळे, जयश्री कोंथिबीरे यांना समजली. त्यांनी पोलिसांना घेऊन विवाहस्थळ गाठले़ हा बालविवाह रोखला.

उद्या पासून शाळेत जाणार

टाकळी कडेवळीत येथील ही मुलगी सध्या शिक्षण घेत आहे. वडिलांच्या दबावामुळे शाळा सोडून कपाळाला विवाहाचे बाशिग बांधण्याची वेळ आली होती. पण श्रीगोंद्यातील सतर्क महिलांमुळे तिची सुटका झाली. त्यामुळे मुलींच्या डोळ्यातून आनंदाश्रू तराळले. मी उद्यापासून पुन्हा शाळेत जाणार आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार, असे त्या मुलीने सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा