शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

रणरागिणींचे आत्मक्लेश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 00:15 IST

पारनेर : दोन वर्षे उलटूनही पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथील निर्भयावर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निवाडा जलदगतीने करावा,

पारनेर : दोन वर्षे उलटूनही पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथील निर्भयावर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निवाडा जलदगतीने करावा, या प्रमुख मागणीसाठी पारनेर तालुक्यातील शेकडो रणरागिणींनी सोमवारी पारनेर येथे आत्मक्लेष आंदोलन केले.लोणी मावळा येथील नववीत शिक्षण घेणाऱ्या निर्भयावर अत्याचार करून तिचा खून झाला होता. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करून जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची विनंती केली होती. त्यावरून खटला जलदगती न्यायालयात सुरू आहे तसेच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम पाहत आहेत. परंतु हे प्रकरण जलदगतीने चालवून न्याय द्यावा, या मागणीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान, पारनेर तालुका पत्रकार संघ, किसान युनियन परिवाराच्यावतीने आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.ग्रामीण साहित्यिक संजय कळमकर म्हणाले, सध्याची पिढी सोशल मीडियात हरवली आहे. त्यामुळे ही पिढी सैराट बनत चालली आहे. त्यात आता संस्कारावर गप्पा मारणारे साहित्यिक कुठे आहेत? असा टोला त्यांनी लगावला. बाजार समितीचे माजी सभापती काशीनाथ दाते म्हणाले, लोणी मावळा येथील मुलीवरील अत्याचाराचा प्रकार गंभीर होता. त्याचा निकाल लवकर लागण्यासाठी सह्याद्री परिवाराने घेतलेला पुढाकार योग्य आहे. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल झावरे म्हणाले, एखाद्या पीडितेला न्याय लवकर न देणे हा अन्याय असून न्यायालयाने समाजमनाचा विचार करावा.संयोजक शिवाजी शिर्के म्हणाले, लोणी मावळातील निर्भयाला दोन वर्षांपासून न्याय मिळाला नाही. दोन वर्षांत फक्त दोनवेळा सुनावणी झाली. परंतु जलदगतीऐवजी जास्त धिम्या गतीने न्यायालयात याची सुनावणी असल्याचे सांगितले. आता न्याय लवकर मिळालाच पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, पत्रकार शिवाजी शिर्के, डॉ.भास्कर शिरोळे, रामदास भोसले, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, सुरेश पठारे, अर्जुन भालेकर, शैलेंद्र औटी, महिला व बालकल्याण सभापती सुरेखा भालेकर, नगरसेविका शशिकला शेरकर, सुधामती कवाद, बबन कवाद, नागेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र मुळे, नजीर तांबोळी आदी हजर होते. पारनेर शहरात मंगळवारी आंदोलनाचा विषय चर्चिला गेला. (तालुका प्रतिनिधी)पारनेर येथील आत्मक्लेश आंदोलनात स्नेहल औटी, तृप्ती चेडे, प्रियंका क्षीरसागर, रूपाली दिघे, माधुरी चव्हाण, ज्योती लंके, संगीता चव्हाण या महाविद्यालयीन युवतींनी आक्रमकपणे मुलींवरील अत्याचाराबाबत भूमिका मांडून न्यायासाठी आम्ही दोन वर्षे लढा देत असून न्यायासाठी किती निर्भयांचा बळी जाणार? असा संतप्त सवालही त्यांनी केला. उपसरपंच सुवर्णा शेंडकर व निर्भयाच्या मावशी म्हणाल्या, आम्हाला लवकर न्याय द्या, आता दारूबंदी झाल्याशिवाय असे अत्याचार थांबणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.आत्मक्लेष आंदोलनात पोलीस उपअधिक्षक आनंद भोइटे, प्रांताधिकारी संतोश भोर, तहसीलदार भारती सागरे,पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर आदींनी लोणी मावळा प्रकरण न्यायप्रविष्ठ असून याबाबत सतरा आॅगस्टपासून सुनावणी सुरू होणार असल्याचे सांगितले. तसेच याप्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.