शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

किल्लेदारांच्या जिल्ह्यात ‘राम’राज्य

By admin | Updated: July 8, 2016 23:32 IST

विश्लेषण- सुधीर लंके अपेक्षेप्रमाणे प्रा. राम शिंदे यांना बढती मिळून त्यांचा कॅबिनेटमंत्रिपदी शपथविधी झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एका निष्ठावान सहकाऱ्याला संधी दिलीच

विश्लेषण- सुधीर लंकेअपेक्षेप्रमाणे प्रा. राम शिंदे यांना बढती मिळून त्यांचा कॅबिनेटमंत्रिपदी शपथविधी झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एका निष्ठावान सहकाऱ्याला संधी दिलीच, पण भाजपात संधीसाधू व ‘सोधा’ पक्षाच्या राजकारणाला फार वाव नाही, हा संदेशही या मंत्रिमंडळ विस्ताराने नगर जिल्ह्याला दिला आहे. शिंदे यांच्या रुपाने अनेक वर्षांनंतर नगर जिल्ह्यातून एका सामान्य घरातील कार्यकर्ता कॅबिनेट मंत्रिपदी पोहोचला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरकडील नववे वंशज हा एक सामाजिक वारसा सोडला, तर शिंदे यांना काहीही राजकीय वारसा नाही. त्यांचे वडील कष्टकरी आहेत. विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर शिंदे यांनी आमदार भीमराव धोंडे यांच्या संस्थेत काही काळ प्राध्यापकी केली. मात्र, १९९७ साली नोकरीचा राजीनामा देऊन ते राजकारणात सक्रिय झाले. सुरुवातीला पंचायत समितीच्या निवडणुकीत ते पराभूत झाले. पुढे चौंडीचे सरपंच झाले. सदाशिव लोखंडे हे कर्जत- जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असताना शिंदे यांच्या पत्नी पंचायत समितीच्या सभापती झाल्या. तेव्हापासून त्यांचा राजकीय उदय झाला.२००९ मध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघ खुला झाल्यानंतर त्यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळाली व पहिल्या दणक्यात ते आमदार झाले. आता सलग दुसऱ्यांदा ते विधानसभेवर आहेत. गत पंचवार्षिकमध्ये देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना शिंदे हे प्रदेश सरचिटणीस होते. त्यावेळी विधानसभेच्या सभागृहात व सभागृहाबाहेर दोघांत जी जवळीक निर्माण झाली त्याचा त्यांना आता फायदा झाला. फडणवीस यांच्या वयाच्या पिढीतील शिंदे हे त्यांचे जवळचे सहकारी आहेत.शिंदे हे एकमेव राज्यमंत्री आहेत की ज्यांना बढती मिळाली. अनेकांसाठी हा धक्का आहे. नगर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार व एक खासदार आहे. त्यामुळे या जिल्ह्याला सत्तेत मोठा वाटा देणे क्रमप्राप्त होते. फडणवीस नगरला काय देणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. आणखी एक मंत्रिपद द्यावे, अशी मागणी होती. जिल्ह्यातील भाजपचे इतर काही आमदार त्यासाठी मुंबईत मुक्काम ठोकून होते. परंतु वाढीव मंत्रिपद न मिळता शिंदे यांनाच पदोन्नती मिळाली. मोदी लाट दिसताच अनेकांनी भाजपात येत ‘नमो’ मंत्राचा गजर केला. मात्र, या सर्वांना नमते घेऊनच पुढे जावे लागेल असे दिसते. नगर जिल्ह्याला शरद पवार हे ‘किल्लेदारांचा जिल्हा’ म्हणतात. येथील प्रत्येक नेत्याने आपल्या मतदारसंघाभोवती भक्कम तटबंदी उभारली आहे. ही तटबंदी भेदणे महाअवघड. या तटबंद्यांना ‘सोधा’ (सोयरे धायरे) पक्षाच्या राजकारणाचे भक्कम सिमेंट भरलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठराविक घराण्यांची सत्ताकेंद्र निर्माण झाली आहेत. शिंदे या सोधा पक्षातले नाहीत. भाजपात जी अंतर्गत गटबाजी आहे त्यातही ते पडत नाहीत. महापौर पदाच्या राजकारणात खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले हे कमळ फुलवायला निघाले होते. त्यावेळी शिंदे एकदम तटस्थ होते. त्यांचा हा संयमीपणा त्यांना कामी आला. शिंदे यांच्याकडे साखर कारखाना नाही. सहकारी संस्थाचे जाळे नाही. मोठी संपत्ती नाही. केवळ पक्षाच्या जोरावर ते कॅबिनेट झाले. नगर सारख्या जिल्ह्यात असे घडू शकते, हा एक मोठा संदेश यानिमित्ताने राजकारणात गेला आहे. प्रा. एस.एम.आय. असीर, बाबुराव भारस्कर, बबनराव ढाकणे, दिलीप गांधी, अनिल राठोड असे काही नेते सोडले तर राज्यात व केंद्रात मराठेतर समाजाला मंत्रिपदाची संधी नगर जिल्ह्यातून फारशी मिळाली नाही. शिंदे यांच्या रुपाने मराठेतर ‘ओबीसी’ चेहरा भाजपने पुढे आणला. सूर्यभान वहाडणे, ना.स. फरांदे या भाजपच्या निष्ठावान नेत्यांना जशी संधी मिळत गेली, तोच अनुभव शिंदे घेत आहेत. धनगर आरक्षणावरुन राज्यात जे राजकारण पेटलेय त्याचा शिंदे यांना फायदा मिळाला. महादेव जानकर हे भाजपला कधी खिंडीत गाठतील याचा फडणवीस यांना भरवसा नाही. त्यामुळे त्यांनी थेट अहिल्यादेवींच्या माहेरचा वंशज आपल्या पाठीशी भक्कमपणे ठेवला आहे. अर्थात धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मोठी सत्वपरीक्षा शिंदे, जानकर यांना द्यावी लागणार आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत शिंदे यांना आपली ताकद दाखवावी लागेल. शिंदे यांचा सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला आहे, अशी तक्रार आहे. त्यावर त्यांना मात करावी लागेल. विकासाचेही अनेक प्रकल्प अडलेले आहेत. शिंदे यावर मात करत ‘राम’राज्य आणणात की सरधोपट मार्गानेच जातात हे आता पहायचे. शिंदे, जानकर समर्थकांत स्पर्धा राम शिंदे व महादेव जानकर या दोघांचेही जिल्ह्यात समर्थक आहेत. दोघांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने दोघांच्याही समर्थकांकडून जल्लोष सुरु आहे. जानकर यांच्या ‘रासप’चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा हे नगर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे शिंदे, जानकर यांचे पुढील संबंध कसे राहतील? याचीही उत्सुकता आहे.