शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मायंबा गडावरील मेळावा संत विचारांचा सद्भावना मंच व्हावा; साधू-संतांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 13:06 IST

वृक्ष लागवड संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, मतदानाची टक्केवारी वाढविणे, सेंद्रिय शेतीची जोपासना करणे, यावर मच्छिंद्रनाथ गडावर नाथभक्तांच्या तपपूर्ती दसरा मेळाव्यात सार्वत्रिक विचारमंथन झाले. मायंबा मेळावा हा जातीपातींच्या कक्षा उल्लंघून संत विचारांचा सदभावना मंच व्हावा, अशी अपेक्षा ही उपस्थित साधू, संत, कीर्तनकार यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

तिसगाव : वृक्ष लागवड संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, मतदानाची टक्केवारी वाढविणे, सेंद्रिय शेतीची जोपासना करणे, यावर मच्छिंद्रनाथ गडावर नाथभक्तांच्या तपपूर्ती दसरा मेळाव्यात सार्वत्रिक विचारमंथन झाले. मायंबा मेळावा हा जातीपातींच्या कक्षा उल्लंघून संत विचारांचा सदभावना मंच व्हावा, अशी अपेक्षा ही उपस्थित साधू, संत, कीर्तनकार यांनी याप्रसंगी व्यक्त केली.पंढरपूर येथील रामदास महाराज जाधव अध्यक्षस्थानी होते. विश्वस्त व विधानपरिषद सदस्य सुरेश धस, माजी आमदार साहेबराव दरेकर, राष्ट्रसंत बद्रीनाथ तनपुरे, बबन महाराज बहिरवाल, छगन महाराज मालुसरे, पंढरीनाथ उंबरेकर, अशोक महाराज मरकड, हंसराज मगर, बापूसाहेब भोसले, मुरलीधर देशमाने, डॉ.सय्यद व्यासपीठावर होते. बद्रिनाथ महाराज तनपुरे म्हणाले, वारकरी संप्रदायाला नाथ संप्रदायाचे विस्तारीत रूप मानले गेले आहे. माणुसकी जपतानाच जातीच्या विरहीत माणसे जोडण्यांसह ती जपण्याची सर्वांगीण कृती झाली पाहिजे. माणसे जोडली गेली की अखंड भारताची स्वप्नपूर्ती सत्यात येऊ शकेल. ती मानवतेची कृती मायंबा मेळाव्यातून सजीव व्हावी. डॉ.समीर सय्यद म्हणाले, संगणकाच्या युगात गरज असताना व अवयवांचे प्रत्यारोपण करताना रक्ताची गरज असताना जात, धर्म, पंथ यांचा विचारही मनाला शिवत नाही. तीच सद्भावना व तोच वैचारिक काला मायंबाचे पवित्र स्थळावरून जगासमोर जावा. रामदास महाराज जाधव यांनी संत सावता महाराज यांचे कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी.. हा सर्वांभूती परमेश्वर पाहण्याचा संदेश अध्यक्षीय भाषणात सांगितला. माजी आमदार दरेकर यांनी मतदानाची घटती टक्केवारी ईव्हीएम मशीन त्रुटी यावर नेटके भाष्य केले. देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी स्वागत केले. प्रास्ताविक आमदार सुरेश धस यांनी केले. सरपंच राजेंद्र म्हस्के यांनी आभार मानले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर