निघोज : पारनेर तालुक्यातील अळकुटी-निघोज-राळेगण थेरपाळ रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाले. या रस्त्याच्या साईटपट्ट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून त्यात तातडीने सुधारणा करून काम उच्च दर्जाचे करावे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात वर्ग झाल्यामुळे कामही चांगल्या प्रतीचे व्हावे. अन्यथा शिवबा व प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष अनिल शेटे यांनी दिला आहे. सध्या अळकुटी- निघोज या रस्त्याच्या साईटपट्ट्याचे काम सुरू आहे. १ मीटरची म्हणजेच ३ फूट ३ इंच रुंदी या साईटपट्ट्यांची आहे. काही ठिकाणी हे काम २ फूटही झालेले दिसत नाही. टाकण्यात येणारा मुरुम नावालाच टाकण्यात येत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे, असे शिवबा संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
राळेगण थेरपाळ रस्त्याच्या साईटपट्ट्या निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:18 IST