शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

दारुबंदीसाठी राजुरीकर रस्त्यावर

By admin | Updated: July 11, 2016 23:47 IST

जामखेड : मागणी करुनही दारुबंदी होत नसल्याने संतप्त राजुरी (ता. जामखेड) येथील महिला, पुरूषांनी रस्त्यावर उतरुन प्रशासनाचा निषेध नोंदविला.

जामखेड : मागणी करुनही दारुबंदी होत नसल्याने संतप्त राजुरी (ता. जामखेड) येथील महिला, पुरूषांनी रस्त्यावर उतरुन प्रशासनाचा निषेध नोंदविला. जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या सक्षम असलेल्या राजुरी गावात कायमस्वरूपी दारूबंदी व्हावी, यासाठी महिला व पुरुषांनी अनेकदा लढा दिला. तरीही दारुबंदी होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी जामखेड-खर्डा मार्गावरील राजुरी बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात पुरुषांबरोबर महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यापुढे गावात दारुबंदी न झाल्यास निरनिराळ्या पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात कॉ. राजाभाऊ देशमुख, बाप्पू धांडे, आश्रू काळदाते, युवा नेते मल्हारीराज सदाफुले, गणेश कोल्हे, नगरसेवक मोहन पवार तसेच ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते,गावकरी व महिला सहभागी झाल्या होत्या. जामखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना निवेदन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.ग्रामसभेत ठराव, उपोषण, आंदोलन करुनही राजुरी गावात दारुबंदी होत नसल्याने महिला, पुरुषांच्या भावना तीव्र होत्या. (तालुका प्रतिनिधी)