शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

अभियांत्रिकीचा देशप्रगतीत बहुमोल वाटा- राजकुमार देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:49 IST

अभियंत्यांचे देशप्रगतीतील योगदान, अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन, भविष्यात अभियांत्रिकीसमोरील आव्हाने, बदल अशा सर्वच बाजूंनी नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार देशपांडे यांच्याशी साधलेला हा संवाद.

अभियंता दिन/संडे मुलाखत/

चंद्रकांत शेळके/अहमदनगर : आधुनिक भारतातील अभियंत्यांचे प्रेरणास्थान डॉ. मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस (१५ सप्टेंबर) भारतात अभियंता दिन म्हणून साजरा होतो. या पार्श्वभूमीवर अभियंत्यांचे देशप्रगतीतील योगदान, अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन, भविष्यात अभियांत्रिकीसमोरील आव्हाने, बदल अशा सर्वच बाजूंनी नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार देशपांडे यांच्याशी साधलेला हा संवाद.अभियांत्रिकीमुळे समाजाची, देशाची प्रगती कशी साधली जाते?आज भारताने या बाबतीत बराच मोठा पल्ला गाठला आहे. भारताची यशस्वी मंगळ मोहीम हे त्याचेच एक उदाहरण आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम फत्ते करणारा भारत हा आशिया खंडातील पहिला देश ठरला, कारण येथील अभियंते कौशल्यपूर्ण आहेत. उपग्रहांच्या आधारे चालणारी जीपीएस सिस्टिम भारताने विकसीत केली असून यासाठी भारताला आता गुगलवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हे सर्व भारताच्या प्रगतीतील मैलाचे दगड आहेत.सध्या भारतात अभियंत्यांची स्थिती कशी आहे?सध्या भारतातून अनेक अभियंते दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडतात. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अभियंत्यांचे फक्त पुस्तकी ज्ञान उपयोगी पडणार नसून त्यास प्रात्यक्षिकाची आणि त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे कौशल्याची जोड देणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षात अभियांत्रिकीची ध्येयधोरणे कशी राहिली?भारताने गेल्या काही वर्षात आखलेली ध्येयधोरणे ही परदेशातही वाखाणली गेली आहेत. डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी प्रकल्प, मेक ईन इंडिया, ई-क्रांती, ई-गव्हर्नन्स, डिजिटल लॉकर, स्टार्ट अप हे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. त्यातून नक्कीच देशप्रगतीत हातभार लागेल.अभियांत्रिकी समोरील आव्हाने कोणती? अभियांत्रिकी शिक्षणपद्धतीत बदल आवश्यक आहेत का?खरं तर अभियंते हे देशसेवकच आहेत. देशापुढील समस्या, आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी त्यांचे कौशल्य वापरायला हवे. नैसर्गिक आपत्तीत उपाययोजना करणे, इंधनाचे मर्यादित स्त्रोत लक्षात घेता अपारंपरिक उर्जा स्त्रोताचा वापर, प्रदूषण नियंत्रण, भूकंपरोधक घरे असा सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, त्यावर उपाययोजना करणे ही काही आव्हाने अभियंत्यांसमोर आहेत. कौशल्य हा यशस्वी इंजिनिअर्सचा मूलमंत्र आहे. ‘प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग’, स्किलबेस्ड इंजिनिअरिंग, इंडस्ट्री ओरिएंटेड लर्निंग यावर यापुढील काळात शिक्षणसंस्थांनी विचार करणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखत