शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

शेती उत्पन्नात विसापूर कारागृह राज्यात दुसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 10:39 IST

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहाने शेती उत्पन्नात राज्यात दुसरा तर पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. कैदी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारागृहाची ७५ एकर शेती फुलवली आहे.

ठळक मुद्देपश्चिम विभागात प्रथमआर्थिक वर्षात मिळाले साठ लाखाचे उत्पन्न

नानासाहेब जठारविसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहाने शेती उत्पन्नात राज्यात दुसरा तर पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. कैदी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारागृहाची ७५ एकर शेती फुलवली आहे.कारागृहाने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ६१ लाख ४० हजार ९८६ रुपयांच्या शेती उत्पन्नातून शासनाला महसूल मिळवून दिला. कारागृहाचा दर्जा २०१३ पासून खुले कारागृहाचा झाल्यापासून शेतीची प्रगती झाली आहे. सध्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले १०९ कैदी आहेत. अधिक्षक दत्तात्रय गावडे, तुरुंगाधिकारी बाळकृष्ण जासुद, आर.पी.पवार व ५५ कर्मचारी कार्यरत आहेत.गहू, ज्वारी,बाजरी व तूर या पिकांबरोबरच उसाचे पीक घेतले जाते. भाजीपाल्यात कांदा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, बटाटा, वांगी, कारली, दोडका, डांगर व दुधी भोपळा या फळ भाज्यांबरोबरच मेथी, पालक या पालेभाज्यांची पिके घेतली जातात. कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. कारागृहात पिकवलेले धान्य व भाजीपाला नगर, येरवडा, भायखळा, अर्थररोड (नाशिक) येथील कारागृहांना पुरवला जातो. कारागृहाचे एक ते दहा नंबरचे शेतीचे मळे आहेत. त्याप्रत्येक मळ्यात देखरेखीसाठी कर्मचारी नेमले आहेत. यामध्ये विजय खराडे, सुधाकर तमेवार, अण्णासाहेब भंगड, देविदास पाखरे,बाळासाहेब गेंड यांचा समावेश आहे. शेतीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून कारागृहाने वाशिंग सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी प्रमोद डहाळे यांच्या देखरेखीखाली वाशिंग सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे.कारागृहात दुुग्ध, शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसायकारागृहात दुधासाठी गायी, शेतीसाठी बैल अशी एकूण १३५ लहान, मोठी जनावरे आहेत. या जनावरांचा चारण्यासाठी स्वतंत्र कैद्याची गुराखी म्हणून नेमणूक आहे. शेळी पालनात ७५ शेळी व बोकड आहेत. शेळ्या चारण्यासाठी कैद्याची नेमणूक आहे. कुक्कुट पालन व्यवसायही केला जातो. यामध्ये १२० कोंबड्या आहेत. कारागृहास सध्या कृषी सहाय्यक नाही. परंतु अधीक्षक दत्तात्रय गावडे कृषी पदवी धारक असल्याने ते स्वत: शेतीची देखरेख करतात.कारागृहात काम करण्या-या कुशल कैद्यांना ६१ रुपये, अर्धकुशल कैद्यांना ५५ रुपये तर अकुशल कैद्यांना ५० रुपये रोजंदारी प्रमाणे मेहनताना दिला जातो. त्यामुळे सजा भोगत असतानाही ते त्यांचे कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात. - बाळकृष्ण जासुद, तुरुंगाधिकारीपालकमंत्री राम शिंदे यांच्या सहकार्याने व जिल्हाधिकाºयांच्या नाविन्यपूर्ण योजनेतून रस्त्यासाठी १४.७० लाख निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विसापुरच्या मुख्य रस्त्यापासून कारागृहाच्या आत बराकीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. -दत्तात्रय गावडे, अधिक्षक, विसापुर खुले जिल्हा कारागृह.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा